---Advertisement---

विराटची साडेसाती संपेना! सिडनीच्या मैदानावर पुन्हा अपयशी

On: शुक्रवार, नोव्हेंबर 27, 2020 6:42 PM
---Advertisement---

भारतीय कर्णधार विराट कोहलीने ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध नेहमीच दमदार कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियन भूमीवर खेळतांना देखील त्याने धावांची लयलूट केल्याचे दिसून आले आहे. पण सिडनी क्रिकेट मैदानावर मात्र विराट मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आहे.

आत्तापर्यंत विराटने सिडनी क्रिकेट मैदानावर खेळलेल्या एकदिवसीय सामन्यांत ५ डावांमध्ये फक्त एकदा दुहेरी आकडा गाठला आहे. त्याची ह्या मैदानावर सर्वोच्च धावसंख्या २१ आहे. शुक्रवारच्या(२७ नोव्हेंबर) सामन्यांत हा इतिहास बदलण्याची संधी विराटकडे होती. परंतु चांगल्या सुरूवातीनंतर २१ धावांवर असतांना कोहली जोश हॅझलवूडच्या गोलंदाजीवर ऍरोन फिंचच्या हाती झेल देऊन बाद झाला.

विराटचे सिडनीच्या मैदानावरील आकडे

विराट कोहलीने सिडनीच्या मैदानावर खेळलेल्या एकदिवसीय सामन्यांतील ५ डावात अनुक्रमे २१, ३*, १, ८ आणि ३ अशा धावा केल्या आहेत. शुक्रवारीही २१ चेंडूत २१ धावा काढून बाद झाल्याने विराटच्या सिडनीच्या मैदानावरील अपयशाकडे पून्हा एकदा सर्वांचे लक्ष गेले. येत्या दौऱ्यात भारतीय संघाला सिडनीच्या मैदानावर अजून १ एकदिवसीय आणि २ टी-२० सामने खेळायचे असल्याने भारतीय कर्णधाराने ही आकडेवारी सुधारण्याची नितांत गरज आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

अबब! स्टीव स्मिथचे भारताविरुद्धचे ‘हे’ आकडे तुम्हालाही करतील थक्क

IND vs AUS ODI : धवन आणि पांड्याची झुंज व्यर्थ, पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियाचा भारतावर दणदणीत विजय

‘विश्वातील सर्वात वेगवान माणूस’, अधिक वजनामुळे त्या सुरक्षारक्षकाला समालोचकानेच केले ट्रोल; पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---