क्रिकेटविश्वात वनडे क्रिकेट धोक्यात आणि विराट कोहलीची कामगिरी याच्यावरच सध्या अधिक चर्चा होत आहेत. विराट कोहलीच्या फॉर्मबाबत अनेक दिग्गजांनी आपापली मते व्यक्त केली आहेत. त्यामध्ये काहींनी त्याच्यावर टीका तर काहींनी त्याची पाठराखण केली आहे. भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील वनडे, टी२० मालिकेसाठी विराटला विश्रांती दिली आहे. त्यातच रॉबिन उथप्पाने विराटच्या खेळीवर कोणीही प्रश्न उपस्थिती करू नये, असे विधान केले आहे.
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) मागील काही महिन्यांपासून त्याच्या कारकिर्दीच्या अत्यंत वाईट फॉर्ममधून जात आहे. त्याने मागील दीड वर्षापासून शतक केले नसल्याने त्याच्या संघातील जागेवर प्रश्न निर्माण केले जात आहेत. यामुळे त्याच्या काही संघसहकाऱ्यांनी आणि माजी क्रिकेटपटूंनी त्याची पाठराखण केली आहे. चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) यानेही पुढे येत विराटचे उघडपणे समर्थन केले आहे.
उथप्पाने म्हटले, “विराटने ज्याप्रकारे कामगिरी केली आहे ती पाहता कोणालाही त्याच्यावर प्रश्न निर्माण करण्याचा अधिकार नाही. तो रजेवर जातो यावरही प्रश्न उठवले जात आहेत.”
एका मुलाखतीमध्ये भारताच्या या माजी क्रिकेटपटूने म्हटले, “विराटमध्ये अजून खूप क्रिकेट शिल्लक आहे. तो ३०-३५ शतकेही मारू शकतो. त्याच्या संघातील जागेवर कोणीही प्रश्न विचारू शकत नाही. तसेच त्याने कसे खेळावे हे सांगण्याचाही कोणाला अधिकार नाही.”
“एका पाठोपाठ शतके करत होता तेव्हा त्याने कसे खेळावे हे कोण सांगत नव्हते. तर आताही त्याने कसे खेळावे हे सांगण्याचाही कोणाला अधिकार नाही. त्याला फक्त खेळ खेळू द्या, त्याचा आनंद घेऊ द्या. त्याला माहित आहे या अडचणीतून कसा मार्ग काढावा ते,” असेही पुढे उथप्पाने म्हटले आहे.
विराटने २००९ ते २०१९ या कालावधीत वनडेत शतके केली आहेत. त्यातील २०१७ ते २०१९ पर्यंत प्रत्येक वर्षांमध्ये पाचपेक्षा अधिक वनडे शतके केली आहेत. तर २०१७ आणि २०१८मध्ये प्रत्येकी ५-५ कसोटी शतके झळकावली आहेत. त्यामुळे त्याने आतापर्यंत ७० आंतरराष्ट्रीय शतके केली आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता सुट्टी नाही! पाकिस्तानला पछाडत टीम इंडिया टी२० क्रमवारीत टॉपवर, वनडे- कसोटीतही दबदबा कायम
वाढदिवस विशेष- जॉन्टी रोड्सबद्दल या ५ मनोरंजक गोष्टी माहित आहेत का?






