भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या हितसंबंधाच्या संघर्षाच्या बाबतीत अडचणीत सापडला आहे. दोषी आढळल्यानंतर त्याला आपल्या कर्णधारपदावर पाणी सोडावे लागू शकते. भारतीय वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्माचा मेहूणा आणि टॅलेंट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट कॉर्नरस्टोनचा मुख्य कार्यकारी अधिकारी बंटी सजदेह याने विराटला फसविण्यासाठी कट रचले जात असल्याचा दावा केला आहे.
बंटीने सोमवारी (६ जुलै) याबाबतीत बोलताना म्हटले, काही लोक आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी विराटची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे अजीव सदस्य संजीव गुप्ता (Sanjeev Gupta) यांनी कर्णधार विराट (Virat Kohli) विरोधात परस्पर हितसंबंधाबद्दल तक्रार केली होती. त्याचबरोबर आरोप केला होता की त्याने एकाचवेळी दोन पदे भूषविली आहेत.
संजीव गुप्ता यांनी केला परस्पर हितसंबंधाबद्दल आरोप
गुप्ता यांनी आरोप केला आहे की विराट भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार असून तो कॉर्नरस्टोन वेंचर पार्टनर्स एलएलपी व विराट कोहली स्पोर्ट्स एलएलपी या कंपन्यांचा डायरेक्टर आहे. याच कंपन्यांचा को डायरेक्टर असलेला बंटी सजदेह हा कॉर्नरस्टोन स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमीटेडचा भाग आहे.
यातील कॉर्नरस्टोन स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमीटेड कंपनी भारतातील अनेक खेळाडूंचे टॅंलेंट मॅनेजमेंट पाहते. टॅलेंट मॅनेजमेंट म्हणजेच त्यांच्या आर्थिक बाजू पाहणे व इतर व्यवस्थापन करणे होय.
गुप्ता यांनी विराटवर आरोप केले की असे करणे हे बीसीसीआयच्या (BCCI) घटनेचे उल्लंघन आहे. आणि त्यानुसार कोणताही व्यक्ती एकाच वेळी अनेक पदांवर राहू शकत नाही.
विराटला बनदाम करण्याचे षडयंत्र
बंटीने (Bunty Sajdeh) स्पष्ट केले की कॉर्नरस्टोन स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमीटेडमध्ये विराटची एक क्लायंटशिवाय इतर कोणतीही भूमिका नाही. तो कॉर्नरस्टोन वेंचर पार्टनर्स एलएलपी आणि विराट कोहली स्पोर्ट्स एलएलपीमध्ये बंटीबरोबर डायरेक्टर आहे.