अॅडलेड। भारताने आॅस्ट्रेलिया विरुद्ध अॅडलेड ओव्हल मैदानावर पार पडलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात 31 धावांनी विजय मिळवला आहे आणि 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
भारताने हा विजय कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली मिळवला आहे. त्यामुळे विराटने आता कर्णधार म्हणून आॅस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका अशा तिन्ही देशात कसोटी विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे या तिन्ही देशात विराटने या वर्षीच विजय मिळवले आहेत.
त्यामुळे विराट हा आॅस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या तिन्ही देशात कसोटी सामना जिंकणारा पहिला आशियाई कर्णधार ठरला आहे.
भारताचे माजी कर्णधार राहुल द्रविड आणि एमएस धोनी यांनी इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये कर्णधार म्हणून कसोटी सामन्यात विजय मिळवला होता. पण त्यांना आॅस्ट्रेलियात विजय मिळवण्यात अपयश आले होते.
विराटने जानेवारी महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यात झालेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा सामना जिंकला होता. पण भारताला या मालिकेत 2-1 असा पराभव स्विकारावा लागला होता.
तसेच इंग्लंडमध्ये आॅगस्ट महिन्यात झालेल्या 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने ब्रिस्बेन येथे झालेला तिसरा कसोटी सामना जिंकला होता. आता भारताने आॅस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेचीही विजयी सुरुवात केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–काय सांगता! टीम इंडियाने १० वर्षांनी आॅस्ट्रेलियात जिंकला कसोटी सामना
–आॅस्ट्रेलिया विरुद्ध भारत: अॅडलेड कसोटीत भारताचा ३१ धावांनी विजय
–एमएस धोनीच्या कूल विक्रमाला यष्टीरक्षक रिषभ पंतचा धक्का