विराट कोहली (Virat Kohli ) याने सोमवारी (25 मार्च) इंडियन प्रीमियर लीग 2024चा पहिला सामना खेळला. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि पंजाब किंग्ज यांनी एकमेकांविरुद्धच्या सामन्याती आयपीएल 2024 हंगामाची सुरुवात केली. आरसीबीला विजयासाटी 177 धावांचे लक्ष्य मिळाले. लक्ष्याचा पाठलाग करताना विराटने 31 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले.
पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात विराट कोहली याने 49 चेंडूत 77 धावांची खेळी करून विकेट गमावली. यात 11 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. सलामीला आलेल्या विराटचे अर्धशतक आरसीबीसाठी महत्वाचे ठरले. पण पहिल्या पाच पैकी एकही खेळाडू त्याला अपेक्षित साथ देऊ शकला नाही. असे असले तरी विराटने केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर दिग्गजाने खास विक्रम नावावर केला. विराट टी-20 क्रिकेटमध्ये 100 पेक्षा जास्त वेळा अर्धशतकी खेळी करणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. याआधी ही कामगिरी वेस्ट इंडीजचा दिग्गज ख्रिस गेल आणि ऑस्ट्रेलियाचा महान सलामीवीर डेव्हिड वॉर्नर यांनी केली होती.
टी-20 क्रिकेटमध्ये 100 किंवा त्यापेक्षा जास्त वेळा अर्धशतकी खेळी करणारे खेळाडू
110 – ख्रिस गेले
109 – डेव्हिड वॉर्नर
100 – विराट कोहली
(VIRAT KOHLI become a First Indian to score 100 fifty-plus scores in T20 cricket)
दोन्ही संघांची प्लेयिंग इलेवेन –
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक, अनुज रावत (यष्टिरक्षक), अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.
पंजाब किंग्ज –शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, सॅम कुरन, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, राहुल चहर.
महत्वाच्या बातम्या –
पहिल्याच सामन्याचा टॉस आरसीबीच्या नावावर, ‘या’ प्लेयिंग एलेवनसह उतरणार मैदानात
हंगामातील पहिल्या विजयासाठी आसीबीला 177 धावांचे लक्ष्य, शशांक सिंगकडून झंझावाती शेवट