भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) श्रीलंकेविरुद्ध मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर आपला १०० वा कसोटी सामना (Virat Kohli’s 100th Test) खेळतो आहे. या सामन्यात विराटला त्याचे अर्धशतकही पूर्ण करता आले नाही. परंतु त्याने छोटेखानी खेळी करत मोठमोठे विक्रम आपल्या नावे केले आहेत.
या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडली होती. भारताकडून कर्णधार रोहित शर्मा आणि मयंक अगरवाल सलामीला फलंदाजीसाठी मैदानावर उतरले होते. परंतु केवळ ५२ धावांवर त्यांची जोडी तुटली. लहिरू कुमाराच्या गोलंदाजीवर सुरंगा लकमलच्या हाती झेल देत रोहित २९ धावांवर बाद झाला.
त्यानंतर चौथ्या क्रमांकावर विराट फलंदाजीसाठी मैदानावर आला होता. हनुमा विहारीसोबत मिळून त्याने आपल्या खेळीची संथ सुरुवात केली होती. दरम्यान काही मोठे फटके मारत त्याने चेंडूला सीमारेषेबाहेर टोलवले आणि ३८ धावा जोडत नव्या विक्रमाला गवसणी घातली. ३८ वी धाव घेताच त्याने कसोटीतील वैयक्तिक ८००० धावा (Virat Kohli Completed 8000 Test Runs) पूर्ण केल्या. त्यातही विक्रमी अशा १०० व्या कसोटी सामन्यात हा पराक्रम करत त्याने आपल्या विक्रमाला अजूनच खास बनवले.
विराटपूर्वी केवळ ऑस्ट्रेलियाचे माजी फलंदाज रिकी पाँटिंग (Ricky Ponting) यांना हा किर्तीमान जमला आहे. त्यांनी २००६ साली दक्षिण आफ्रिकाविरुद्ध सिडनी येथे कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना खेळला होता. याच सामन्यात त्यांनी त्यांच्या ८००० कसोटी धावा पूर्ण केल्या होत्या. विराट आणि पाँटिंग यांच्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही फलंदाजाला (Reaching 8000th Test Runs In 100th Test) ही विलक्षण कामगिरी करता आलेली नाही.
दरम्यान मोहाली कसोटीत आठहजारी मनसबदार बनलेला विराट केवळ ४५ धावांवर त्रिफळाचीत झाला. हनुमा विहारीसोबत मिळून त्याने तिसऱ्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी केली. त्यांच्या भागिदारीला रंगत चढायला सुरुवात झाली असताना ४४ वा षटकाच्या चौथ्या चेंडूवर लसिथ एम्बुलडेनियाने त्याला त्रिफळाचीत केले. त्यामुळे फक्त ५ धावांनी दूर असतानाही विराटला अर्धशतकापासून वंचित राहावे लागले.
दुसरीकडे एम्बुलडेनियाची ही या सामन्यातील दुसरी विकेट ठरली. विराटपूर्वी त्याने भारताचा सलामीवीर मयंक अगरवाल याला पायचित केले होते. मयंक ३३ धावांवर त्याची शिकार बनला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! १०० व्या कसोटीतही विराट शतक करण्यात अपयशी, अवघ्या ‘इतक्या’ धावांवर क्लीन बोल्ड
आयपीएल २०२२ ची जाहिरात लॉन्च! पाहा धोनीचा ‘जबरा स्वॅग’
कधी सुधारणार रोहित शर्मा! मोहाली कसोटीत छोटीशी चूक करत फक्त २९ धावांवर झाला बाद