---Advertisement---

गुगलवरही विराटला नाही पर्याय! साऱ्या जगाला जाणून घ्यायचेय कोण आहे कोहली

On: बुधवार, ऑक्टोबर 25, 2023 7:58 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली हा सध्या जगातील सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो. केवळ क्रिकेट खेळल्या जाणाऱ्या देशातच नव्हे तर इतर देशातही अनेकांना त्याच्याबद्दल उत्सुकता असते. इंस्टाग्राम वर देखील तो सर्वाधिक फॉलोवर्स असणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीमध्ये येतो. नुकत्याच गुगलने जाहीर केलेल्या यादीमध्ये देखील आता तो पहिल्या पाच सर्वाधिक शोध घेतल्या गेलेल्या खेळाडूंमध्ये सामील झाला आहे.

एका संकेतस्थळाने जाहीर केलेल्या सर्वेक्षणात अशा खेळाडूंचा समावेश आहे, ज्यांच्या नावाचा गुगलवर सर्वाधिक शोध घेतला गेला. या यादीमध्ये पहिल्या दहात विराट एकमेव क्रिकेटपटू आहे. तसेच दक्षिण आशियातीलही तो एकमेव खेळाडू आहे. विराट या यादीमध्ये पाचव्या क्रमांकावर दिसून येतो. तब्बल 68 मिलियन लोकांनी त्याच्या नावाचा शोध घेतला.

या यादीमध्ये पोर्तुगालचा फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो 199.4 मिलियन सर्चसह पहिल्या क्रमांकावर आहे. ब्राझीलचा फुटबॉलर नेमार 140 मिलियन सर्चसह दुसऱ्या व लियोनेल मेस्सी 104.4 मिलियन सर्चसह तिसऱ्या क्रमांकावर दिसून येतात. बास्केटबॉलचा दिग्गज लेब्रॉन जेम्स 72.1 मिलियन सर्चसह चौथ्या क्रमांकावर आहे.

(Virat Kohli Becomes Fifth Most Searched Athlete On Google Ronaldo Lead)

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---