केपटाऊनच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (South Africa vs India) यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याचा थरार सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ११३ धावांनी विजय मिळवला होता, तर दुसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाने ७ गडी राखून विजय मिळवला होता. ही मालिका सध्या १-१ च्या बरोबरीत आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात दोन्ही संघांमध्ये रोमांचक लढत पाहायला मिळत आहे. या सामन्यातील पहिल्या डावात विराट कोहली (Virat Kohli) ७९ धावा करत माघारी परतला. त्याचे शतक हुकले असले तरीदेखील त्याच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.
भारतीय संघ अडचणीत असताना कर्णधार कोहलीने डाव सावरला आणि ७९ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. यादरम्यान त्याने ७६ धावा करताच त्याच्या, नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. तो दक्षिण आफ्रिकेत १ हजार धावा पूर्ण करणारा एकमेव भारतीय कर्णधार ठरला आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेत जाऊन १ हजार धावा करणारा तो तिसराच कर्णधार ठरला आहे.
दक्षिण आफ्रिकेत कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रिकी पाँटिंगच्या नावे आहे. रिकी पाँटिंगने १९६६ धावा केल्या आहेत. या यादीत दुसऱ्या स्थानी न्यूझीलंडचे माजी कर्णधार स्टीफन फ्लेमिंग आहे. त्यांनी दक्षिण आफ्रिकेत ११५४ धावा केल्या आहेत. तसेच वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराने कर्णधार म्हणून ९८१ धावा केल्या होत्या. तसेच माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुलीला दक्षिण आफ्रिकेत ९११ धावा करण्यात यश आले होते.
अधिक वाचा – केपटाऊन कसोटीत नाणेफेक जिंकत विराट ‘टॉस का बॉस’च्या यादीत पोहोचला ‘या’ स्थानी
या मोठ्या विक्रमात मिळवले दिग्गजांच्या यादीत स्थान
तसेच अर्धशतकी खेळीसह विराट कर्णधार म्हणून दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक वेळेस ५० पेक्षा अधिक धावांची खेळी करणारा तिसरा पाहुण्या संघाचा कर्णधार ठरला आहे. विराट कोहलीने ७ वेळेस असा कारनामा केला आहे. तर ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार रिकी पाँटिंग या यादीत पहिल्या स्थानी आहे. रिकी पाँटिंगने १६ वेळेस असा कारनामा केला होता, तर ब्रायन लाराने ८ वेळेस असा कारनामा केला होता.
व्हिडिओ पाहा – द्रविडला ‘जॅमी’ टोपणनाव पडलं तरी कसं?
दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक वेळेस ५० पेक्षा अधिक धावा करणारे पाहुणे कर्णधार
१६ वेळेस – रिकी पाँटिंग
८ वेळेस – ब्रायन लारा
७ वेळेस – विराट कोहली*
६ वेळेस – सौरव गांगुली
६ वेळेस – स्टीफन फ्लेमिंग
६ वेळेस – अर्जुन रणतुंगा
महत्वाच्या बातम्या :
द्रविड@49: पहिल्याच आयसीसी पुरस्कारांवर मोहोर उमटवणारा ‘मिस्टर डिपेंडेबल’
विराटच्या शतकाचा दुष्काळ संपता संपेना! इतके दिवस, इतके डाव शंभरीविणा