---Advertisement---

कोहलीने रैनाला टाकले मागे, डिविलियर्सच्या साथीनेही केला खास विक्रम

---Advertisement---

मोहाली। शनिवारी(13 एप्रिल) आयपीएल 2019 मध्ये किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात पार पडलेल्या सामन्यात बेंगलोरने 8 विकेट्सने विजय मिळवला आहे. या सामन्यात बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली आणि एबी डिविलियर्स यांनी अर्धशतके करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

विराटने 53 चेंडूत 67 धावा केल्या. या खेळीत त्याने 8 चौकार मारले. डिविलियर्सने 38 चेंडूत नाबाद 59 धावा करताना 5 चौकार आणि 2 षटकार मारले. तसेच या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 85 धांवांची भागीदारी रचली आहे.

विराटने टाकले रैनाला मागे-

विराटने केलेल्या अर्धशतकामुळे तो आता ट्वेंटी20 क्रिकेट प्रकारात सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याच्या ट्वेंटी20 मध्ये 259 सामन्यात 41.8 च्या सरासरीने 8175 धावा झाल्या आहेत. त्यामुळे त्याने रैनाच्या 8145 धावांना मागे टाकले आहे.

तसेच विराट आता ट्वेंटी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर आक्रमक फलंदाज ख्रिस गेल आहे. गेलने 12640 धावा केल्या आहेत. गेलच्या पाठोपाठ अनुक्रमे ब्रेंडन मॅकेलम(9922), किरॉन पोलार्ड (9222), शोएब मलिक(8701) आणि डेव्हिड वॉर्नर(8460) आहे.

विराट – डिविलियर्स जोडीचा खास विक्रम-

विराट आणि डिविलियर्सने शनिवारी झालेल्या सामन्यात 70 चेंडूत दुसऱ्या विकेटसाठी 85 धावांची भागीदारी रचण्याबरोबरच एक खास विक्रम केला आहे. त्यांची जोडी ही आयपीएलमधील सर्वात यशस्वी जोडी ठरली आहे.

त्यांची जोडी ही आयपीएलमध्ये भागीदारीत सर्वाधिक धावा करणारी जोडी ठरली आहे. या दोघांनी मिळून भागीदारीमध्ये 2788 धावा केल्या आहेत. तसेच विराट आणि ख्रिस गेल या जोडीच्या 2787 या भागीदारीतील धावांना मागे टाकले आहे.

आयपीएलमध्ये भागीदारीत सर्वाधिक धावा करणाऱ्या जोड्या-

2788 धावा – विराट कोहली, एबी डिविलियर्स

2787 धावा – विराट कोहली, ख्रिस गेल

2357 धावा – डेव्हिड वॉर्नर, शिखर धवन

1906 धावा – गौतम गंभीर, रॉबिन उथप्पा

महत्त्वाच्या बातम्या –

पहिल्या विजयानंतरही कर्णधार कोहलीला झाला लाखोंचा दंड, जाणून घ्या कारण

यष्टीरक्षक रिषभ पंतने घेतला अफलातून झेल, पहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment