इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील लॉर्ड्स येथील दुसरा सामना जिंकत भारतीय क्रिकेट संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या जोरावर विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघाने इंग्लंड संघाला खेळाच्या तीनही विभागात संधी दिली नाही. या विजया सोबतच भारतीय कर्णधार विराट कोहलीने भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी त्याला मागे टाकत एका नव्या विक्रमाला गवसणी घातली.
धोनीचा हा विक्रम झाला विराटच्या नावे
लॉर्ड्स कसोटीनंतर अनेक विक्रम भारतीय संघ व कर्णधार विराट कोहलीच्या नावे जमा झाले. मात्र, यादरम्यान एक असा विक्रम बनला ज्याकडे कोणाचे फारसे लक्ष गेले नाही. हा विक्रम म्हणजे एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याचा. विराटने आत्तापर्यंत आपल्या नेतृत्वात इंग्लंडविरुद्ध मायदेशात आणि इंग्लंडमध्ये मिळून भारतीय संघाला ९ विजय मिळवून दिले. हे कोणत्याही भारतीय कर्णधारापेक्षा सर्वाधिक आहेत. यापूर्वीही कामगिरी माजी कर्णधार एमएस धोनीच्या नावे जमा होती. त्याच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियाला ८ वेळा पराभूत केलेले. सौरव गांगुली यांच्या नेतृत्वातील भारतीय संघाने झिम्बाब्वेला ६ सामन्यांमध्ये पराभूत केले होते.
क्रिकेट विश्वातील चौथा यशस्वी कर्णधार
लॉर्ड्स कसोटी जिंकत विराट कोहली हा जागतिक क्रिकेटमधील सर्वात यशस्वी कर्णधारांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहोचला. विराटच्या नेतृत्वातील हा भारताचा ३७ वा कसोटी विजय आहे. त्याने लॉर्ड्स विजयानंतर वेस्ट इंडीजचे महान कर्णधार क्लाइव्ह लॉइड यांना मागे सोडले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजय दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ याच्या नावे असून त्याच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेने ५३ कसोटी विजय मिळवले होते. या यादीमध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे ऑस्ट्रेलियाचे रिकी पॉंटिंग (४८) व स्टीव्ह वॉ (४१) हे आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
दिल्ली कॅपिटल्सने रिलीझ केलेल्या गोलंदाजाची ‘डबल लॉटरी’, धोनीच्या सीएसकेत मिळाली जागा?
‘हिटमॅन’ देतोय विराटच्या साम्राज्याला आव्हान! हेडिंग्ले कसोटी ठरणार महत्वपूर्ण?
भर मैदानात तंबू लावून सामन्याचा आनंद लुटू लागला ‘हा’ व्यक्ती; व्हिडिओ बघून म्हणाल, ‘ओळखीचा दिसतोय’