हेडिंग्लेच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये तिसरा कसोटी सामना पार पडला. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात इंग्लंड संघाने १ डाव आणि ७६ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात पराभूत झाल्यानंतर विराट कोहलीच्या नावे नको असलेल्या विक्रमाची नोंद झाली आहे. यासह त्याने दिग्गज खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले आहे.
विराट कोहली हा एक अप्रतिम फलंदाज आहे. तसेच जेव्हापासून त्याने संघाचे कर्णधारपद स्विकारले आहे. तेव्हापासून त्याने मायदेशात आणि परदेशात भारतीय संघाला अनेक मोठ मोठ्या मालिकेत विजय मिळवून दिले आहेत. परंतु, इंग्लंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पराभूत होताच तो दक्षिण आफ्रिका, इंग्लंड,न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया (सेना) या देशांमध्ये सर्वाधिक कसोटी सामने गमावणारा दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे.
भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी याच्या नावे अनेक विक्रमांची नोंद आहे. त्याने भारतीय संघाला टी -२० विश्वचषक, वनडे विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकून दिली आहे. परंतु, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये सर्वाधिक कसोटी सामने गमावण्याच्या विक्रम एमएस धोनीच्या नावे आहे.
त्याच्या नेतृत्वाखाली या देशांमध्ये भारतीय संघाने १४ कसोटी सामने गमावले आहेत. तसेच विराट कोहली १३ परभवांसह या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. तर मोहम्मद अझहरुद्दीनने ९ सामने गमावले होते. (Virat Kohli becomes second captain to loose most matches in sena countries)
दक्षिण आफ्रिका, इंग्लंड,न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया (सेना) देशांमध्ये सर्वाधिक सामने गमावणारे भारतीय कर्णधार
१४ सामने – एमएस धोनी
१३ सामने – विराट कोहली*
९ सामने – मोहम्मद अझहरुद्दीन
तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा १ डाव आणि ७६ धावांनी पराभव
तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या ७८ धावांवर संपुष्टात आला होता. प्रत्युत्तरात जो रूटच्या शतकी खेळीच्या जोरावर इंग्लंडने ४३२ धावांचा डोंगर उभारला होता. यासह पहिल्या डावात ३५४ धावांची आघाडी घेतली होती.
त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली होती. रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली या तिघांनी अर्धशतकी खेळी करत भारतीय संघाला पुनरागमन करून दिले होते. परंतु, इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. परिणामी भारतीय संघाला अवघ्या २७८ धावा करता आल्या होत्या. हा सामना भारतीय संघाने १ डाव आणि ७७ धावांनी गमावला.
महत्त्वाच्या बातम्या –
तिसऱ्या कसोटीनंतर उभय कर्णधारांनी दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया, विराट म्हणाला…
जो रुटच इंग्लंडचा ‘नंबर वन’ कर्णधार! वॉन, स्ट्रॉससारखे दिग्गजही पडले मागे
शतकाच्या दुष्काळातही कोहलीचा ‘विराट’ कारनामा; लीड्स कसोटीत अर्धशतकासह धोनीला पछाडलं