वनडे विश्वचषक 2023चा पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड संघांमध्ये रंगला आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर या सामन्यासाठी जगभरातील क्रिकेटप्रेमी बुधवारी (15 नोव्हेंबर) जमले. भारताने प्रथम फलंदाजी करताना अप्रतिम सुरुवात मिळवली. यादरम्यानच विराट कोहली वनडे क्रिकेटच्या इतिहासात तिसरा सर्वात यशस्वी फलंदाज बनला.
भारताचा माजी दिग्गज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) हादेखील भारत आणि न्यूयझीलंड यांच्यातील उपांत्य सामन्यासाठी वानखेडे स्टेडियमवर उपस्थित होता. वनडे क्रिकेटच्या इतिहिसात सचिन तेंडुलकर याने सर्वाधिक 18426 धावा केल्या आहेत. यादीत दुसरा क्रमांक श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा (Kumar Sangakkara) याचा आहे. संगकाराच्या नावावर 14234 वनडे धावांची नोंद आहे. बुधवारी (15 नोव्हेंबर) विराट कोहली (Virat Kohli) याने या यादीतील तिसरा क्रमांक पडकावला. याआधी तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा विश्वचषकविजेता कर्णधार रिकी पाँटिंग (Ricky Ponting) तिसरा सर्वाधिक वनडे धावा करणारा फलंदाज होता. पण न्यूझीलंडविरुद्ध केलेल्या खेळीनंतर विराटने पाँटिंगचा हा मोठा विक्रम मोडीत काढला.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
18426 – सचिन तेंडुलकर
14234 – कुमार संगकारा
13718 – विराट कोहली
13704 – रिकी पाँटिंग
(Virat Kohli becomes the 3rd leading run-getter in ODI history)
विश्वचषक 2023 उपांत्य सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
न्यूझीलंड – डेवॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विलियम्सन (कर्णधार), डॅरिल मिचेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), मिचेल सँटनर, टीम साऊदी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट
महत्वाच्या बातम्या –
World Cup Semi Final: वानखेडेवर लागली सेलिब्रिटींची रांग! बेकहॅमपासून बॉलीवूड स्टेडियममध्ये
एक घाव, दोन तुकडे! वर्ल्डकपमध्ये जगात कुणालाच न जमलेला विक्रम रोहितच्या नावे, प्रत्येक भारतीयाला वाटेल अभिमान