भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ टी२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा टी२० सामना रविवारी (१४ मार्च) पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ७ गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे. तसेच कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात महत्वपूर्ण अर्धशतकीय खेळी करत भारतीय संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली आहे. अर्धशतक पूर्ण करताच त्याने नवीन विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.
मागील सामन्यात शून्य धावांवर बाद होणाऱ्या कोहलीने या सामन्यात संघासाठी महत्वाची खेळी केली आहे. त्याने ४९ चेंडूत ७३ धावांची खेळी केली. तसेच षटकार मारत भारतीय संघाला विजय देखील मिळवून दिला. अर्धशतकाचा टप्पा ओलांडताच कोहलीने धाकड फलंदाज रोहित शर्माला मागे टाकत आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५० पेक्षा अधिक धावा (२६ वेळा) करणारा फलंदाज बनला आहे. तर रोहित (२५ वेळा) दुसऱ्या स्थानावर आला आहे.
टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५०+ अधिक धावा करणारे फलंदाज
१) विराट कोहली – (२६ वेळा, भारत)
२) रोहित शर्मा- (२५ वेळा, भारत)
३) डेविड वॉर्नर- (१९ वेळा, ऑस्ट्रेलिया)
४) मार्टिन गप्टील- (१९ वेळा, न्यूझीलंड)
५) पीआर स्टरलींग- (१८ वेळा, आयर्लंड)
६) बाबर आजम- (१६ वेळा, पाकिस्तान)
७) आरोन फिंच – (१६ वेळा,ऑस्ट्रेलिया)
८) ख्रिस गेल- (१५ वेळा, वेस्ट इंडिज)
९) ब्रेंडन मक्युलम- (१५ वेळा, न्यूझीलंड)
१०) केएल राहुल -(१४ वेळा, भारत)
दरम्यान सामन्याविषयी बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने निर्धारित २० षटकात ६ बाद १६४ धावा केल्या. यात सलामीवीर जेसन रॉयच्या सर्वाधिक ४६ धावांचा समावेश होता. ३५ चेंडूत २ षटकार आणि ४ चौकार मारत त्याने ही धावसंख्या केली होती. भारताकडून गोलंदाजी करताना वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दुल ठाकूर यांनी प्रत्येकी २ विकेट्स चटाकवल्या.
प्रत्युत्तरादाखल भारताकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक ७३ धावांची खेळी केली. या खेळीसाठी त्याने ४९ चेंडू खेळले आणि ३ षटकार व ५ चौकार मारले. त्याच्याबरोबर इशान किशननेही ३२ चेंडूत ५२ धावांनी अफलातून खेळी केली. यासह भारताने १७.५ षटकातच ३ विकेट्स गमावत इंग्लंडचे आव्हान पूर्ण केले.
महत्त्वाच्या बातम्या-
Video: पंतने मारला ९० मीटरचा खणखणीत षटकार; कोहलीने अलिंगन देतच केलं कौतूक
‘हीच’ होणार जसप्रीत बुमराहची वधूराणी, बॉलिवूड अभिनेत्रीने केला शिक्कामोर्तब
केवळ ४ धावांनी अर्धशतक हुकलेल्या जेसन रॉयने ‘असा’ व्यक्त केला राग, पाहा व्हिडिओ