आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ‘किंग’ म्हणून ओळखला जाणाऱ्या विराट कोहली याच्यासाठी गुरुवारी (25 जानेवारी) खास ठरला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून दिला जाणारा प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार गुरुवारी घोषित झाला. 2023 मध्ये आपला जुना फॉर्म पुन्हा मिळवल्यानंतर विराट या पुरस्कारासाठी दावेदार होता आणि त्याने हा पुरस्कार नावावर केला देखील. विक्रमी चार वेळा त्याने हा पुरस्कार जिंकला.
विराट कोहली (Virat Kohli) मागच्या वर्षी वनडे विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. त्याने विश्वचषक स्पर्धेत केलेल्या 765 धावांमुळे मालिकावीर पुरस्कार देखील त्यालाच मिळाला होता. त्याचसोबत 50 वनडे शतके करणारा पहिला फलंदाज देखील विराट मागच्याच वर्षी ठरला. त्याने सचिन तेंडुलकर याच्या 49 वनडे शतकांचा विक्रम मोडीत काढला होता. त्याने मागच्या वर्षी कसोटी, वनडे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मिळून 1325 धावा केल्या. वर्षात 1000 पेक्षा अधिक धावा करण्याची ही त्याची आठवी वेळ होती. परिणामी विराट पुन्हा एकदा आयसीसी वनडे प्लेअर ऑफ द इयर ठरला. त्याने 2012, 2017, 2018 नंतर 2023 मधील प्रदर्शनाच्या जोरावर हा पुरस्कार नावावर केला आहे.
– Won in 2012.
– Won in 2017.
– Won in 2018.
– Won in 2023.Virat Kohli becomes the first cricketer to win ODI player of year award four times. 🐐 pic.twitter.com/7QR8PsdkNX
— Johns. (@CricCrazyJohns) January 25, 2024
– ICC ODI player of the year 2012, 2017, 2018, 2023.
– ICC ODI Cricketer Of The Decade.
– ICC Cricketer Of The Decade.
– ICC Cricketer of the year 2017, 2018
– ICC Spirit Of The Game 2019.
– ICC Test Player Of The Year 2018.One name, the 🐐 King Kohli…!!! pic.twitter.com/z49p7DNRyz
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 25, 2024
गुरुवारी आयसीसी कसोटी क्रिकेटर ऑफ द इयर म्हणून उस्मान ख्वाजा याची निवड देखील केली. ऑस्ट्रेलियन सलामीवीर फलंदाज मागच्या वर्षभरात संघासाठी सातत्यापूर्ण धावा करत असून महत्वाची भूमिका पार पाडत आला आहे. आयसीसी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटर म्हणून बुधवारी (14 जानेवारी) सूर्यकुमार यादव याची निवड झाली होती. सूर्यकुमारने क्रिकेटच्या सर्वात छोट्या फॉरमॅटमध्ये भारतीय संघासाठी महत्वपूर्ण धावा आणि शतकी खेली केली आहे. त्याचसोबत आयसीसी एमर्जिंक प्लेअर ऑफ द इयर पुरस्कार न्यूझीलंडच्या रचिन रविंद्र याला दिला गेला आहे. रचिनने विश्वचषकासारख्या महत्वाच्या स्पर्धेत 3 शतके ठोकली असून एकूण 578 धावांचे योगदान संघासाठी दिले. (Virat Kohli becomes the first cricketer to win ODI player of year award four times.)
महत्वाच्या बातम्या –
संपूर्ण यादी: आजपर्यंत ICCकडून सर्वोत्तम कसोटीपटू म्हणून सन्मानित झालेले क्रिकेटपटू
उस्मान ख्वाजाने जिंकला 2023 ‘आयसीसी टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार, ‘हा’ भारतीयही होता शर्यतीत