---Advertisement---

विराटने घेतला एक झेल आणि झाला मोठा विक्रम!

On: शनिवार, फेब्रुवारी 22, 2020 5:16 PM
---Advertisement---

वेलिंग्टन।न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात सध्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना बासिन रिझर्व स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यात आज(22 फेब्रुवारी) दुसऱ्या दिवसाखेर न्यूझीलंडने पहिल्या डावात 71.1 षटकात 5 बाद 216 धावा केल्या आहेत. तसेच 51 धावांची आघाडी घेतली आहे. या डावात भारताचा कर्णधार विराट कोहलीने क्षेत्ररक्षण करताना खास विक्रम केला आहे.

त्याने आज न्यूझीलंडचा फलंदाज हेन्री निकोल्सचा आर अश्विनच्या गोलंदाजीवर झेल घेतला. याबरोबरच त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 250 झेल घेण्याचा टप्पा पूर्ण करण्याचा पराक्रम केला आहे.

त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षक म्हणून (यष्टीरक्षक व्यतिरिक्त) 250 किंवा त्यापेक्षा अधिक झेल घेणारा चौथाच भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे. याआधी हा टप्पा राहुल द्रविड, मोहम्मद अझरुद्दीन आणि सचिन तेंडूलकरने पार केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या भारतीयांमध्ये द्रविड अव्वल क्रमांकावर आहे. त्याने 509 सामन्यात 334 झेल घेतले आहेत.

विराटचे आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 415 सामन्यात 250 झेल झाले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षक म्हणून सर्वाधिक झेल घेणाऱ्या एकूण क्रिकेटपटूंच्या यादीत तो 15 व्या क्रमांकावर आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर माहेला जयवर्धने असून त्याने 440 झेल घेतले आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणारे भारतीय क्रिकेटपटू –

334 – राहुल द्रविड (509 सामने)

261 – मोहम्मद अझरुद्दीन (433 सामने)

256 – सचिन तेंडूलकर (664 सामने)

250 – विराट कोहली (415 सामने)

186 – विरेंद्र सेहवाग (374 सामने)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---