---Advertisement---

एबी डिविलियर्सला विराट कोहलीच्या भावनिक शुभेच्छा!

On: शनिवार, मे 26, 2018 6:50 PM
---Advertisement---

बुधवारी, दक्षिण आफ्रिकेचा महान खेळाडू एबी डिविलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे अनेकांनी त्याच्या निवृत्तीबद्दल सोशल मिडियावर त्याला शुभेच्छा आणि संदेश लिहिले आहेत.

असाच एक भावनिक ट्विट भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने केला आहे. विराट आणि डिविलियर्स आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून एकत्र खेळतात. तसेच हे दोघे चांगले मित्र देखील आहेत.

विराटने त्याच्या ट्विटमध्ये डिविलियर्सला भाऊ म्हणून संबोधताना त्याच्या यशस्वी कारकिर्दीबद्दल आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्याचा आणि डिविलियर्सचा फोटो शेअर केला आहे.

विराट आणि डिविलियर्सने बेंगलोरकडून एकत्र खेळताना अनेक चांगल्या भागीदारी रचल्या आहेत. आयपीएलमधील सर्वोच्च भागीदारीचा विक्रमही या दोघांच्या नावावर आहे.

विराटबरोबरच अनेक भारतीय खेळाडूंनीही डिविलियर्सला शुभेच्छा दिल्या आहेत.

एबी डीविलियर्सने आत्तापर्यंत दक्षिण आफ्रिकेडून 114 कसोटीत 50.66च्या सरासरीने 8765, वनडेत 228 सामन्यात 53.5च्या सरासरीने 9577 तर टी20मध्ये 78 सामन्यात 26.12च्या सरासरीने 1672 धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

आशियाई गेम्सच्या उद्घाटन आणि समारोप सोहळ्यावेळी महिला खेळाडू नाही नेसनार साडी

गंभीर आरोप- आॅस्ट्रेलियन प्रशिक्षक आॅस्ट्रेलियाच्याच खेळाडूंनाच आयपीएलमध्ये स्थान देतात

सुपर ओव्हर ‘मेडन’ टाकणाऱ्या जगातील एकमेव गोलंदाजाला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

१८ वर्षापूर्वी गांगुली आणि द्रविडने रचला होता हा ‘दादा’ विक्रम

राशिद खान अफगाणिस्तानचा हिरो आहे, आम्ही त्याला भारताला देणार नाही!

मोठा खेळाडू कसोटी मालिकेतून बाहेर

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment