---Advertisement---

विराट झाला अलिबागकर! मि & मिसेस कोहलीचा नवा ‘आशियाना’ तब्बल इतक्या कोटींचा

---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व वरिष्ठ फलंदाज विराट कोहली सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार सामन्याची कसोटी मालिका खेळत आहे. भारतीय संघासाठी योगदान देत असतानाच आता त्याने एक नवी प्रॉपर्टी देखील खरेदी केली. विराटने मुंबई जवळीलच अलिबाग या निसर्गरम्य ठिकाणी एक विला खरेदी केल्याचे वृत्त समोर येते. विराटने मागील वर्षी देखील अलिबाग येथे एक फार्म हाऊस खरेदी केले होते.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, विराटने अलिबाग येथील आवास विलीन या ठिकाणी हा विला खरेदी केला असून, याची किंमत जवळपास सहा कोटी रुपये आहे. जवळपास 2000 स्क्वेअर फुट इतकी जागा असलेला हा विला मांडवा जेटीपासून अवघ्या काही मिनिटांच्या अंतरावर असल्याचे सांगितले जाते. मुंबईपासून स्पीड बोटने गेल्यास अवघ्या पंधरा मिनिटात या ठिकाणी पोहोचता येते.

विराट सध्या व्यस्त असल्याने त्याचा भाऊ विकास याने या सर्व जागेसाठीच्या कागदपत्रांची पूर्तता केली. या नव्या बिलासाठी जवळपास 36 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी भरण्यात आल्याचे सांगितले जाते. मागील वर्षी अलिबाग येथील झिराड या गावामध्ये विराटने एक फार्म हाऊस खरेदी केले आहे. त्या फार्म हाऊसची किंमत वीस कोटींच्या घरात असल्याचे सांगितले जाते. विराटव्यतिरिक्त भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने देखील अलिबागमध्ये एक फार्म हाऊस विकत घेतले आहे.

विराट सध्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत खेळताना दिसतोय. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात तो फारशी चमकदार कामगिरी करू शकला नाही. इंदोर येथे मालिकेतील तिसरा सामना 1 मार्चपासून खेळला जाईल. हा सामना जिंकून मालिका आपल्या नावे करण्याचा भारतीय संघ प्रयत्न करेल.

(Virat Kohli Bought New Villa In Alibag Which Price More Than 6 Crores)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कारकिर्दीतील 9व्या इनिंगमध्ये हॅरी ब्रुकचा विश्वविक्रम, भारतीय दिग्गजाचा मागे टाकत केल्या सर्वाधिक धावा
ते परत येतायेत! आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या खेळाडूंची लीजेंड्स लीग ‘या’ तारखेपासून होतेय सुरू

 

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---