आयपीएल २०२१ चा ३५ वा सामना सीएसके आणि आरसीबी यांच्यात शुक्रवारी (२४ सप्टेंबरला) पार पडला. यामध्ये सीएसकेने सहा विकेट्स राखत आरसीबीवर विजय मिळवला. सामन्यात आरसीबीचा कर्णधार विराट कोहली चांगल्या फार्ममध्ये दिसला. त्याने ३६ चेंडूंमध्ये त्याचे अर्धशतक पूर्ण केले. सलामी जोडी देवदत्त पडीक्कल आणि विराट कोहली यांनी १११ धावांची भागीदारी करत आरसीबीला एक चांगली सुरुवात करून दिली होती. विराट चांगल्या लयात असताना सीएसकेच्या ड्वेन ब्रावोने त्याला बाद केले. विराटने ४१ चेंडूत एक षटकार आणि सहा चौकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या. हे त्याचे आयपीएमधील ४६ वे अर्धशतक होते. या अर्धशतकासोबतच त्याने या सामन्यादरम्यान काही विक्रमही त्याच्या नावावर केले आहेत.
विराट कोहलीने शिखर धवनचा विक्रम मोडला
कालच्या सीएसकेविरुद्धच्या सामन्यात विराटने अर्धशतकी खेळी केल्यानंतर तो सीएसकेविरुद्ध सर्वाधिक वेळा अर्धशतक करणार खेळाडू ठरला आहे. त्याचे हे सीएसकेविरुद्धचे ९ वे अर्धशतक ठरले आहे आणि शिखर धवनला मागे टाकत अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू बनला आहे, ज्याने सीएसकेविरुद्ध सर्वाधिक वेळा अर्धशतकी खेळी केली. शिखर धवनने आतापर्यांत धोनीच्या सीएसकेविरुद्ध ८ वेळा अर्थशतक केले आहे. तसेच मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने सात वेळा ही कामगिरी केली आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा सीएसकेविरुद्ध अर्धशतक किंवा त्याहून मोठी खेळी करणारे खेळाडू
९ – विराट कोहली
८ – शिखर धवन
७ – रोहित शर्मा
७ – डेविड वार्नर
५ – शेन वॉटसन
५ – गौतम गंभीर
विराटने या विक्रमामध्ये केली शिखर धवनची बरोबरी
आयपीएमध्ये विराटने केलेले हे ४६ वे अर्धशतक होते, यापूर्वी ही कामगिरी शिखर धवननेही आयपीएमध्ये ४६ वेळा अर्धशतकी खेळी केली आहे. सर्वाधिक वेळा अर्धशतक करण्याच्या बाबतीत डेव्हिड वार्नर पहिल्या स्थानावर आहे, त्याने आयपीएमध्ये आतापर्यंत ५४ वेळा अर्धशतकी खेळी केली आहे. तसेच एबी डिव्हिलियर्स ४३ आणि रोहित शर्माने ४१ वेळा ही कामगिरी केली आहे.
आयपीएमध्ये सर्वाधिक वेळा अर्धशतक किंवा त्याहून मोठी खेळी केलेल्या खेळाडूंची यादी
54 – डेविड वार्नर
४६ – विराट कोहली
४६ – शिखर धवन
४३ – एबी डिव्हिलियर्स
४१ – रोहित शर्मा
आरसीबीद्वारे सीएसके विरुद्धच्या सामन्यात सलामीविरांनी केलेली सर्वात मोठी भागीदारी
१११ – पडीक्कल/कोहली
१०९ – गेल/कोहली
१०३ – डिकाॅक/एबी