---Advertisement---

डिविलियर्सला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना खास मित्र विराटने का म्हणले ‘बिस्टिक’? जाणून घ्या कारण

On: गुरूवार, फेब्रुवारी 17, 2022 7:47 PM
ab-virat
---Advertisement---

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिविलियर्स  (AB de Villiers)यांची मैत्री जगापासून लपलेली नाही. या दोघांनीही अनेकदा आपल्या मैत्रीबद्दल उघडपणे चर्चा देखील केली आहे. हे दोन्ही खेळाडू अनेकवर्षे आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघाकडून एकत्र क्रिकेट खेळले. त्याचमुळे त्यांच्यातील मैत्री फुलली. दरम्यान, गुरुवारी (१७ फेब्रुवारी) डिविलियर्सने त्याचा ३८ वा वाढदिवस साजरा केला. त्यामुळे आपल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त विराटने खास पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली होती. 

विराटने डिविलियर्सला बिस्किट म्हणून संबोधले
‘मिस्टर ३६०’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डिविलियर्सला विराटने इंस्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टमध्ये विराट आणि डिविलियर्स यांचा फोटो आहे. तसेच त्यावर लिहिले आहे की, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा बिस्कीट. माझ्या भावा तुला खूप प्रेम.’ (Virat Kohli Calls AB De Villiers Biscuit)

म्हणून विराट डिविलियर्सला म्हणतो बिस्कीट
विराटने डिविलियर्ससाठी केलेली पोस्ट पाहून अनेकांना प्रश्न पडला की, विराटने डिविलियर्स ‘बिस्कीट’ असं का संबोधले. तर त्याचे कारण २०२० मध्ये एका व्हिडिओमध्ये विराटने स्पष्ट केले होते. विराटने सांगितले होते की, ‘मी हा शब्द दक्षिण आफ्रिकेच्या बोलीभाषेतून घेतला आहे. खरंतर त्याचा अर्थ तुम्हाला ज्या व्यक्ती आवडतात, ज्या तुमच्या जवळच्या असतात, त्यांना तुम्ही बिस्कीट किंवा बिस्कोट, असं म्हणता. कारण सर्वांनाच बिस्किट आवडतात, हो ना?’

Virat-Kohli-Insta
Photo Courtesy: Instagram/virat.kohli

विराट आणि डिविलियर्स अनेकवर्षे खेळले एकत्र
विराट २००८ पासून, तर डिविलियर्स २०११ पासून रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळत आहेत. मात्र, आता डिविलियर्सने गेल्याचवर्षी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यामुळे आयपीएल २०२२ मध्ये डिविलियर्स आयपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही. त्यामुळे अनेक चाहत्यांनी विराट आणि डिविलियर्सची जोडी मैदानावर एकत्र दिसणार नसल्याबद्दल दु:ख व्यक्त केले होते.

आयपीएलमध्ये विराट आणि डिविलियर्सने एकत्र खेळताना अनेकदा मोठ्या भागीदाऱ्याही केल्या आहेत. विशेष म्हणजे आयपीएलमधील सर्वोच्च भागीदारीचा विक्रमही विराट आणि डिविलियर्सच्या नावावर आहे. त्यांनी गुजरात लायन्सविरुद्ध २०१६ साली २२९ धावांची भागीदारी केली होती. एवढंच नाही तर, या यादीत दुसऱ्या क्रमांकावरही या दोघांचेच नाव आहे. त्यांनी २०१५ साली मुंबई इंडियन्स विरुद्ध नाबाद २१५ धावांची भागीदारी केली होती. पण आता डिविलियर्सने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने ही जोडी एकत्र खेळताना दिसणार नाही.

डिविलियर्सने आयपीएलमध्ये १८४ सामन्यांत ५१६२ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या ३ शतकांचा आणि ४० अर्धशतकांचा समावेश आहे. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा एकूण सहाव्या क्रमांकाचा खेळाडू आहे, तर दुसऱ्या क्रमांकाचा परदेशी खेळाडू आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

श्रेयस अय्यरला वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या टी२० सामन्यात का मिळाली नाही जागा? रोहितकडून खुलासा

रहाणे ‘अजिंक्य’! नाबाद शतकासह दिली निवडसमितीला सणसणीत चपराक

कौतुक तर व्हायलाच पाहिजे! पहिली आंतरराष्ट्रीय विकेट घेताच विराट-रोहितने थोपटली बिश्नोईची पाठ, व्हिडिओ व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---