वेस्ट इंडिज संघ सध्या भारत (West Indies tour of india) दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये नुकताच ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने ३-० ने विजय मिळवला होता. ही मालिका झाल्यानंतर दोन्ही संघ ३ टी२० सामन्यांच्या मालिकेसाठी आमने सामने येणार आहे. या मालिकेत भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) एक मोठा विक्रम आपल्या नावावर करण्याची सुवर्णसंधी असणार आहे
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यातील पहिला टी२० सामना बुधवारी (१६ फेब्रुवारी ) ईडन गार्डनच्या मैदानावर पार पडणार आहे. या सामन्यात अवघ्या ७३ धावा करताच विराट कोहलीच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद होणार आहे. तो या सामन्यात टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरू शकतो. विराट कोहलीने आतापर्यंत ९५ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ३२२७ धावा केल्या आहेत. तर रोहित शर्माने (Rohit sharma) आतापर्यंत ३२०० धावा केल्या आहेत.
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम न्यूझिलंडचा विस्फोटक फलंदाज मार्टिन गप्टीलच्या (Martin guptill) नावे आहे. त्याने आतापर्यंत ३२९९ धावा केल्या आहेत. विराट कोहलीने ७३ धावा करताच तो मार्टिन गप्टीलला मागे टाकू शकतो. विराट कोहलीला गेल्या काही महिन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. परंतु या मालिकेत त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
विराट कोहलीने गतवर्षी झालेल्या आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेनंतर टी२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्याला वनडे संघाच्या कर्णधार पदावरून काढून टाकले होते. वेस्ट इंडिज विरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत त्याला एकही मोठी खेळी करता आली नव्हती.
पहिल्या टी२० सामन्यात विराट कोहलीच्या नावे आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद होऊ शकते. रोहित शर्मा आणि विराट कोहली हे दोघेही १००० धावांचा पल्ला गाठू शकतात. ५८ धावांची भागीदारी करताच त्यांच्या नावावर या विक्रमाची नोंद होणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
आज ईडन गार्डन्सवर रंगणार भारत – वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टी२० सामना, ‘अशी’ असू शकते प्लेइंग ११