रविवारपासून (21 ऑक्टोबर) भारत विरुद्ध विंडीज यांच्यात पाच सामन्यांची वनडे मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला वनडे क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण करण्याची आणि दिग्गज फलंदाज सचिन तेंडूलकरचा एक खास विक्रम मोडण्याचीही संधी आहे.
विराटने 211 सामन्यांत खेळताना 203 डावांत 9779 धावा केल्या आहेत. यामुळे त्याचा दहा हजार क्लबमध्ये समावेश होण्यासाठी त्याला फक्त 221 धावांची गरज आहे.
तसेच या मालिकेत विराटने जर दहा हजार धावा पूर्ण केल्या तर तो वनडेमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करणारा फलंदाज ठरेल. सध्या हा विक्रम सचिनच्या नावावर असून त्याने 259 डावांत दहा हजार धावांचा आकडा पार केला होता. यामुळे विराटचा वनडेमधील फॉर्म पाहता तो सचिनचा हा विक्रम सहज मोडू शकतो.
विराटच्या आधी जगातील एकूण 12 फलंदाजांनी 10,000 धावा केल्या आहेत. यामध्ये भारताकडून सचिन (18,426 धावा), सौरव गांगुली (11,363), राहुल द्रविड (10,889) आणि एमएस धोनी (10,123) या चार जणांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–सचिन तेंडुलकर, सौरव गांगुलीचा या विक्रमाला आहे हिटमॅन रोहित शर्माकडून धोका
–वाढदिवसाच्याच दिवशी कुंबळेने केले विराटला टॅग
–मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहानने केला काँग्रेसमध्ये प्रवेश