धरमशाला। उद्यापासून (१२ मार्च) भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातील ३ सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना उद्या धरमशाला येथे भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरु होणार आहे. या मालिकेत भारताचा कर्णधार विराट कोहलीला खास विक्रम करण्याची संधी आहे.
या मालिकेत विराट कोहलीने जर ९९ किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २२ हजार धावांचा टप्पा पार करेल. हा टप्पा पार करणारा तो जगातील ८ वा क्रिकेटपटू, तर तिसरा भारतीय क्रिकेटपटू ठरेल. याआधी सचिन तेंडूलकर आणि राहुल द्रविड या माजी भारतीय क्रिकेटपटूंनी हा टप्पा पार केला आहे.
विराटने सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४१६ सामन्यात ५६.१५ च्या सरासरीने २१,९०१ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या ७० शतकांचा आणि १०४ अर्धशतकांचा समावेश आहे.
त्याचबरोबर सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विश्वविक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने ६६४ सामन्यात ४८.५२ च्या सरासरीने १०० शतके आणि १६४ अर्धशतकांसह ३४,३५७ धावा केल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू –
३४३५७ धावा – सचिन तेंडुलकर
२८०१६ धावा – कुमार संगकारा
२७४८३ धावा – रिकी पाँटिंग
२५९५७ धावा – माहेला जयवर्धने
२५३३४ धावा – जॅक कॅलिस
२४२०८ धावा – राहुल द्रविड
२२३५८ धावा – ब्रायन लारा
२१९०१ धावा – विराट कोहली
महत्त्वाच्या बातम्या-
–किंग कोहलीला सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मागे टाकत इतिहास घडवण्याची सुवर्णसंधी
–“भारताला भारतातच पराभूत करणे अशक्य”
–कोरोनामुळे महाराष्ट्र सरकार आपल्या राज्यातून आयपीएलचे सामने ढकलणार पुढे?






