पहिल्या कसोटी विजयानंतर भारतीय संघाला 27 सप्टेंबरपासून कानपूर येथे दुसरा व शेवटचा कसोटी सामना खेळायचा आहे. हा सामना जिंकत भारतीय संघ 2-0 च्या फरकाने बांगलादेशला व्हाईटवॉश देण्यासाठी प्रयत्नशील असेल. तर बांगलादेशचा संघ लाज राखण्यासाठी शेवटची कसोटी जिंकण्यावर भर देईल. दरम्यान दिग्गज फलंदाज विराट कोहली ग्रीन पार्कवर होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात अनेक विक्रम रचू शकतो. 129 धावा करून तो नऊ हजार धावा करणाऱ्या क्रिकेटपटूंच्या क्लबमध्ये सामील होईल. तर, विराट 1000 चौकार मारण्यापासून सात पावले दूर आहे.
ग्रीन पार्कमध्ये विराट 5 वेळा खेळला आहे
किंग कोहली याआधी पाच वेळा ग्रीन पार्कमध्ये खेळला आहे. विराटने आतापर्यंत खेळलेल्या 114 कसोटी सामन्यांमध्ये 8871 धावा केल्या आहेत. आता पुढील सामन्यात 129 धावा करताच तो नऊ हजार धावा करणारा खेळाडू बनेल. तो महान इंग्लिश क्रिकेटपटू ग्रॅहम गूचच्या 8900 धावांपेक्षा फक्त 129 धावांनी मागे आहे. याशिवाय तो एक हजार चौकार ठोकण्यापासून फक्त सात पावले दूर आहे, त्याने आतापर्यंत आपल्या कसोटी कारकिर्दीत 993 चौकार मारले आहेत.
विराट कोहली चेन्नईत फ्लॉप ठरला
ग्रीन पार्क येथे होणारा कसोटी सामना अनेक अर्थाने रेकॉर्डब्रेकर ठरणार आहे. चेन्नईत खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत विराटच्या फ्लॉप शोनंतर आता दुसऱ्या कसोटीत क्रिकेटप्रेमींना त्याच्या शानदार खेळीची अपेक्षा असेल. आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत 17 खेळाडू नऊ हजार धावांच्या क्लबमध्ये सामील झाले आहेत.
सचिन आणि राहुलच्या क्लबमध्ये प्रवेश करण्याची संधी
ग्रीन पार्कमध्ये खेळणारा विराट जगातील 18 वा खेळाडू बनू शकतो. भारतातून सचिन तेंडूलकर, राहुल द्रविड आणि सुनील गावस्कर या क्लबमध्ये सामील झाले आहेत. त्याचबरोबर 1000 चौकारांबद्दल बोलायचे झाले तर, या क्लबमध्ये विराटच्या आधी सचिन, राहुल, विरेंद्र सेहवाग आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी हा पराक्रम केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
सलग दुसऱ्या विजयासाठी कानपूर कसोटीत ‘या’ खेळाडूला मिळाली पाहिजे संधी, मांजरेकरांची मागणी
IND vs BAN: दुसऱ्या सामन्यातही विजय फिक्स? कानपूरच्या मैदानावर भारताची आकडेवारी शानदार