---Advertisement---

IND vs NZ Final: फायनलमध्ये विराट कोहली रचणार इतिहास! ‘हे’ 4 मोठे विक्रम करण्याची संधी

On: शुक्रवार, मार्च 7, 2025 10:56 PM
---Advertisement---

यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या (ICC Champions Trophy 2025) फायनल सामन्यात भारत आणि न्यूझीलंड संघ (9 मार्च) रोजी दुबईच्या मैदानावर आमने-सामने असणार आहेत. या सामन्यात भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीवर (Virat Kohli) सर्वांच्या नजरा असणार आहेत. विराट सध्या खूप चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत स्पर्धेत 2 उत्कृष्ट डाव खेळले आहेत. अशा परिस्थितीत, त्याच्याकडून पुन्हा एकदा संघाला चमकदार फलंदाजीची अपेक्षा असेल. जर त्याची बॅट चालली तर तो फायनलमध्ये काही मोठे विक्रमही करू शकतो.

1) चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा- चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सध्या ख्रिस गेलच्या नावावर आहे. गेलने 17 सामन्यांमध्ये 791 धावा केल्या आहेत, तर विराट कोहली त्याच्यानंतर दुसऱ्या स्थानावर आहे. कोहलीने आतापर्यंत 746 धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत, जर कोहलीने फायनलमध्ये 46 धावा केल्या तर तो स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाज बनेल.

2) आयसीसी वनडे स्पर्धेच्या फायनलमध्ये सर्वाधिक धावा- विराटने आतापर्यंत आयसीसी वनडे स्पर्धांच्या फायनलमध्ये एकूण 137 धावा केल्या आहेत, तर ऑस्ट्रेलियाचा अॅडम गिलख्रिस्ट या बाबतीत पहिल्या स्थानावर आहे, ज्याने 4 सामन्यांमध्ये 262 धावा केल्या आहेत. अशा परिस्थितीत, जर विराट फायनल सामन्यात 126 धावा करण्यात यशस्वी झाला तर तो गिलख्रिस्टचा विक्रम मोडेल.

3) वनडे क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्याची संधी- वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली 14,180 धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. त्याच्या पुढे दुसऱ्या स्थानावर कुमार संगकारा आहे ज्यांच्याकडे 14234 धावा आहेत. अशा परिस्थितीत, न्यूझीलंडविरुद्ध तो 55 धावा करताच, तो संगकाराला मागे टाकून दुसरे स्थान पटकवेल.

4) आयसीसी वनडे स्पर्धेच्या फायनल सामन्यात भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होण्याची संधी- भारतासाठी आयसीसी वनडे स्पर्धेच्या फायनल सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सौरव गांगुलीच्या नावावर आहे, ज्याने 4 सामन्यांमध्ये 70.50च्या सरासरीने 141 धावा केल्या आहेत. विराट कोहलीने 4 सामन्यांमध्ये 34.25च्या सरासरीने 137 धावा केल्या आहेत. जर विराटने न्यूझीलंडविरुद्धच्या फायनल सामन्यात 5 धावा केल्या तर तो गांगुलीला मागे टाकेल.

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs NZ Final: नव्या खेळपट्टीवर नाही खेळला जाणार फायनल सामना! भारताला होणार मोठा फायदा?
IND vs NZ Final: न्यूझीलंडने दिलेल्या ‘या’ 3 जखमांचा बदला घेण्याची भारतीय संघाला संधी!
भारतीय खेळाडूची जादू! न्यूझीलंड संघाच्या रणनीतीचा केला पार भुगा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---