---Advertisement---

विजयाच्या आनंदात कर्णधार कोहलीने घेतली चाहत्यांबरोबर सेल्फी, पहा व्हिडिओ

On: शुक्रवार, जून 28, 2019 3:12 PM
---Advertisement---

मँचेस्टर। गुरुवारी(27 जून) 2019 विश्वचषकातील 34 व्या सामन्यात भारताने विंडीज विरुद्ध 125 धावांनी विजय मिळवून या स्पर्धेतील पाचवा विजय मिळवला आहे. या विजयानंतर भारताचा कर्णधार विराट कोहलीने चाहत्यांबरोबर सेल्फी घेत आनंद साजरा केला आहे.

या सामन्यासाठी भारतीय चाहत्यांनी मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डमैदानात मोठ्याप्रमाणात उपस्थित राहून भारतीय संघाला भरभरुन प्रतिसाद दिला. त्यामुळे विराटने चाहत्यांबरोबर सेल्फी घेत त्यांना आनंद दिला.

विराटने चाहत्यांबरोबर घेतलेल्या या सेल्फीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याने या पोस्टला कॅप्शन देताना म्हटले आहे की ‘फुटबॉलचे माहित नाही, पण आज मँचेस्टर निळे होते. शानदार सांघिक विजय.’

विराट हा फुटबॉलचा मोठा चाहता आहे. तसेच फुटबॉलमध्ये मँचेस्टक युनायटेड आणि मँचेस्टर सिटी यांच्यात होणारा मँचेस्टर डर्बीचा सामना चांगलाच प्रसिद्ध आहे. मँचेस्टर युनायटेड संघाची जर्सी लाल आहे तर मँचेस्टर सिटीच्या जर्सीचा रंग निळा आहे.

या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना  50 षटकात 7 बाद 268 धावा केल्या. भारताकडून कर्णधार विराट कोहलीने 72 धावांची तर एमएस धोनीने नाबाद 56 धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच विंडीजकडून गोलंदाजीत केमार रोचने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.

त्यानंतर भारताने दिलेल्या 269 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजला 34.2 षटकात सर्वबाद 143 धावाच करता आल्या. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या.

त्याचबरोबर विराटला त्याने केलेल्या महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळीसाठी या सामन्याचा समनावीर पुरस्कार देण्यात आला.

तसेच या पराभवामुळे विंडीजचे या विश्वचषकातील आव्हानही संपुष्टात आले आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

कॉट्रेल बाद होताच शमी-विराटने केले त्याच्याच सॅल्यूट स्टाईलने सेलिब्रेशन,पहा व्हिडिओ

एमएस धोनीला पाठिंबा देत कर्णधार कोहलीने असे केले कौतुक

…म्हणून रोहित शर्माच्या विकेटची होत आहे सर्वाधिक चर्चा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment