भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बाॅर्डर गावस्कर मालिकेला शानदार सुरुवात झाली आहे. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पर्थ कसोटीत शानदार विजय मिळवला. या विजयाने भारत सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने पुढे आहे. पहिल्या कसोटी टीम इंडियाने अष्टपैलू कामगिरी केली. ज्यात विराट कोहलीने देखील मोलाचे योगदान दिले होते. त्याने पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात शानदार शतक झळकावले. मालिकेतील दुसरी कसोटी ॲडलेड येथील ॲडलेड ओव्हल येथे खेळवली जाणार आहे. हा सामना 6 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. दरम्यान ॲडलेडमध्येही चाहत्यांना विराट कोहलीकडून शानदार खेळीची अपेक्षा आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ॲडलेडमध्ये ‘कोहली-कोहली’चे नारे ऐकू येत आहेत. कोहलीला पाहिल्यानंतर चाहत्यांचे नियंत्रण सुटताना दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये विराट कोहली आणि शुबमन गिल सरावासाठी जात आहेत. यावेळी किंग कोहलीची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुर दिसत आहेत. हताश चाहते एकसुरात ‘कोहली-कोहली’ असा जयघोष करताना पाहायला मिळत आहेत. कोहलीनेही चाहत्यांना प्रतिक्रिया दिल्या आहेत. यानंतर दोन्ही फलंदाज सरावासाठी पुढे निघून जातात.
पाहा व्हिडिओ-
THE CHANTS & CRAZE FOR VIRAT KOHLI AT ADELAIDE.🐐
King Kohli – He defines the true Aura & Charisma. 👑 pic.twitter.com/3OcqvwjAgh
— Tanuj Singh (@ImTanujSingh) December 3, 2024
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात ॲडलेडमध्ये पिंक बॉल डे-नाईट कसोटी खेळली जाणार आहे. या सामन्याच्या तयारीसाठी टीम इंडियाने कॅनबेरा येथे ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध दोन दिवसीय गुलाबी चेंडूचा सराव सामना खेळला. सामन्याचा पहिला दिवस पावसात वाहून गेला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन्ही संघांमध्ये 46-46 षटकांचा सामना झाला. गुलाबी चेंडूवर झालेल्या सराव सामन्यात टीम इंडियाने 6 विकेट्सने विजय मिळवला होता. मात्र, सराव सामन्यात विराट कोहली फलंदाजीसाठी मैदानात आला नव्हता.
जसप्रीत बुमराहने पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेच्या पहिल्या कसोटीत टीम इंडियाची कमान सांभाळली होती. टीम इंडियाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध नव्हता. दुसऱ्या मुलाच्या जन्मामुळे रोहित ऑस्ट्रेलियाला जाऊ शकला नाही. मात्र, रोहित शर्मा ॲडलेड कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाला पोहचला आहे. आता तो दुसऱ्या कसोटीपूर्वी संघाची कमान हाती घेतली आहे.
हेही वाचा-
‘लोकांनी पृथ्वी शॉची सचिनशी तुलना करून चूक केली, त्यानी आता विराट कोहलीकडून प्रेरणा घ्यावी’
15 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर या संघानं वेस्ट इंडिजमध्ये कसोटी सामना जिंकला, मालिका बरोबरीत
IND vs AUS: टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अनेक बदल निश्चित, रोहित शर्मा हा मोठा निर्णय घेणार का?