---Advertisement---

विश्वचषक २०१९: भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी ही आहे सर्वात आनंदाची बातमी

On: सोमवार, जून 3, 2019 12:37 PM
---Advertisement---

साउथँम्पटन। 2019 विश्वचषकात भारताचा पहिला सामना बुधवारी (5 जून)  दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध होणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली फिट आहे. त्यामुळे भारतीय संघाबरोबरच चाहत्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

याबद्दल संघाच्या एका सुत्राने पीटिआयला सांगितले की ‘फलंदाजी करताना त्याच्या आंगठ्याला लागले होते. पण तो ठिक आहे. सध्या काळजी करण्याचे काही कारण नाही.’

विराटला शनिवारी(1 जून) भारतीय संघाच्या सराव सत्रावेळी आंगठ्याची दुखापत झाली होती. तसेच काही रिपोर्टच्या अनुसार विराटच्या आंगठ्यावर लगेचच भारतीय संघाचे फिजिओथेरपिस्ट पॅट्रिक फर्हाट यांनी उपचार केले.

त्याचबरोबर त्याने संपूर्ण सराव सत्रात भागही घेतला होता. पण सराव सत्रानंतर विराटने ड्रेसिंगरुममध्ये परतताना बर्फाने भरलेल्या ग्लासमध्ये आंगठा ठेवला होता. 

विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत खेळाडूंना दुखपतींपासून लांब ठेवण्याचे सर्वच संघांसमोर आव्हान आहे.

भारतीय संघाचे खेळाडू विजय शंकर आणि केदार जाधवही याआधी दुखापतीला सामोरे गेले आहेत. शंकरला हाताला चेंडू लागल्याने तो न्यूझीलंड विरुद्धच्या सराव सामन्यात खेळला नव्हता. पण तो या दुखापतीतून लवकर सावरला. त्यामुळे त्याला बांगलादेश विरुद्धच्या सराव सामन्यात संधी देण्यात आली.

त्याचबरोबर केदारला आयपीएल दरम्यान खांद्याची दुखापत झाली होती. तोही या दुखापतीतून सावरत आहे. त्याने नुकतेच नेटमध्ये सरावालाही सुरुवात केली आहे. पण तरीही अजून दक्षिण आफ्रिकाविरुद्ध त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे. या दुखापतीमुळे त्याला दोन्ही सराव सामन्यात विश्रांती देण्यात आली होती.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडीबातम्यासदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

वाढदिवस विशेष: सुलतान ऑफ स्विंग – वसीम अक्रम

विराटने भेट दिलेली बॅट राशीद खानकडून या खेळाडूने घेतली हिरावून

टीम इंडियातील हा खेळाडू सर्वोत्तम क्षेत्ररक्षक, ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज कर्णधाराचे मत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment