भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली याचा मैदानासोबतच सोशल मीडियावरही दबदबा आहे. विराटने क्रिकेटच्या मैदानावर अनेक कारनामे केले आहेत. तो मैदानावर उतरल्यानंतर रोज काही ना काही मोठे विक्रम आपल्या नावावर करत असतो. आता मैदानावर नसतानाही विराटने एक पराक्रम नोंदविला आहे. मात्र ,यावेळी त्याने मैदानावर नाही तर सोशल मीडियावर हा पराक्रम केला.
काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपले 71 वे शतक पूर्ण करणाऱ्या विराटच्या ट्विटर अकाऊंटवर फॉलोअर्सची संख्या आता 50 मिलियनच्या पुढे गेली आहे. विराट कोहली त्याच्या ट्विटर अकाउंटवर 50 मिलियन फॉलोअर्सचा आकडा पार करणारा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. विराट कोहलीचे ट्विटर अकाऊंट आता भारतातील तिसरे सर्वात प्रसिद्ध ट्विटर हँडल बनले आहे. त्याच्यापेक्षा जास्त फॉलोअर्स फक्त प्रधानमंत्री कार्यालयाचे अधिकृत ट्विटर अकाउंट आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाउंटवर आहेत.
केवळ ट्विटरच नव्हेतर, विराट कोहलीचे इंस्टाग्रामवरही 211 मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवर 200 मिलियन फॉलोअर्स असलेला विराट पहिला भारतीय आहे. याबाबतीत विराटच्या जवळ एकही भारतीय नाही. इतकेच नव्हेतर, 100 मिलियन इंस्टाग्राम फॉलोअर्स पूर्ण करणारा विराट पहिला भारतीय ठरला होता.
इंस्टाग्राम फॉलोअर्सच्या बाबतीत विराटने जगातील अनेक मोठ्या सेलिब्रिटींना मागे टाकले आहे. मात्र, तरीही जगात असे चार लोक आहेत जे या बाबतीत विराटच्या पुढे आहेत. इंस्टाग्राम फॉलोअर्सच्या बाबतीत विराट कोहलीच्या पुढे फक्त दिग्गज फुटबॉलर ख्रिस्टीयानो रोनाल्डो (476 मिलियन), हॉलीवुड अभिनेत्री कायली जेनर (366 मिलियन), सेलेना गोमेज (342 मिलियन) आणि अभिनेता ड्वेन जॉन्सन (334 मिलियन) आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आता धवन फक्त ‘बदली कर्णधार’ म्हणूनच संघात सामील होणार का?
रैना, इरफानने गायलेल्या गाण्यांवर युवीचा बेधुंद डान्स, हा व्हिडिओ नाही पाहिला तर काय पाहिले!
अर्शदीपच्या निवडीनंतर आईने दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “माझ्या मुलाने या वयात…”