जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा किताब जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाने भारतीय संघासमोर भल्यामोठ्या 444 धावांचे आव्हान दिले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 3 बाद 164 धावा केल्या आहेत. भारतीय संघाचा सर्वात अनुभवी फलंदाज विराट कोहली हा नाबाद 44 धावा काढून मैदानावर आहे. त्याने दिवसातील आपला अखेरचा चौकार मारताना ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक मैलाचा दगड पार केला.
ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या गावातही शानदार फलंदाजी करताना भारतीय संघासमोर विजयासाठी 444 धावांचे तगडे आव्हान ठेवले आहे. त्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी देखील उत्कृष्ट फलंदाजी केली. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहली व अजिंक्य रहाणे यांनी दिवसाखेरपर्यंत किल्ला लढवतान 71 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. विराट 44 तर रहाणे 20 धावा काढून खेळत आहे.
दिवसातील अखेरचे षटक टाकण्यासाठी आलेल्या नॅथन लायन याला पहिल्या चेंडूवर चौकार मारत विराटने 44 धावा पूर्ण केल्या. यासोबतच ऑस्ट्रेलियाविरुद्ध क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये 5000 धावा करणारा तो दुसरा फलंदाज बनला. यापूर्वी अशी कामगिरी केवळ भारताचा सर्वकालीन महान फलंदाज सचिन तेंडुलकर याने केली आहे. सचिनने आपल्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 6707 धावा केल्या आहेत. या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडिजच्या ब्रायन लारा याचा क्रमांक लागतो. लाराने आपल्या कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4714 धावा केल्या होत्या. तर, डेस्मंड हेन्स यांनी 4495 धावा केल्या आहेत.
भारतीय संघाला या अंतिम सामन्यात विजय मिळवण्यासाठी विराट कोहलीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहावे लागणार आहे. भारतीय चाहत्यांना या अंतिम सामन्यात विराटकडून शतकाची अपेक्षा असेल. भारताला अखेरच्या दिवशी विजयासाठी 7 गड्यांच्या मोबदल्यात 280 धावांची गरज आहे.
(Virat Kohli Complete 5000 International Runs Against Australia In All Formats At WTC Final)
महत्वाच्या बातम्या –
रहाणे-विराटच्या खांद्यावर भारताला डब्ल्यूटीसी चॅम्पियन बनवण्याची जबाबदारी! शेवटचा दिवस निर्णायक
कसोटीत ऑस्ट्रेलियाला चोपणाऱ्या 5 भारतीयांच्या यादीत विराटचाही समावेश, पण ‘किंग’चा नंबर कितवा?