---Advertisement---

आशिया खंडात डंका वाजवलेल्या दिग्गज फलंदाजांच्या ‘या’ खास यादीत आता विराटचाही समावेश

On: शनिवार, मार्च 20, 2021 10:20 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी२० मालिकेतील पाचवा टी२० सामना आज (२० मार्च) खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने इंग्लंड संघासमोर २२५ धावांचे आव्हान दिले आहे. भारताकडून सलामीला आलेल्या विराट कोहलीने अर्धशतकी खेळी केली. यासोबतच त्याने आणखी एक विक्रम करत दिग्गज खेळाडूंच्या यादीत प्रवेश केला आहे.

प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघातील फलंदाजांनी इंग्लंड संघाच्या गोलंदाजांना चांगलेच चोपून काढले. तसेच कर्णधार विराट कोहलीने ५२ चेंडूत नाबाद ८० धावांची खेळी केली आहे. या खेळीत त्याने २ षटकार आणि ७ चौकार लगावले आहेत.

या खेळीच्या जोरावर त्याने आशियामध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ६ वा क्रमांक पटकावला आहे. त्याने आशियामध्ये खेळलेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकूण १३००० धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. या यादीत ३ दिग्गज श्रीलंकन खेळाडूंचा देखील समावेश आहे. तसेच सचिन तेंडुलकर या यादीत सर्वोच्च स्थानी आहे. त्याने आशिया खंडात एकूण २१७४१ धावा केल्या आहेत.

आशिया खंडात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
१)सचिन तेंडुलकर : २१७४१,(भारत)
२)कुमार संगकारा : १८४२३,(श्रीलंका)
३)महेला जयवर्धने: १७३८६,(श्रीलंका)
४)सनाथ जयसूर्या : १३७५७,(श्रीलंका)
५)राहुल द्रविड : १३४९७,(भारत)
६)विराट कोहली: १३०००,(भारत)

महत्त्वाच्या बातम्या –

रोहित शर्माने अर्धशतक तर झळकावलेच पण या मानाच्या यादीतही पटकावले दुसरे स्थान

कहर कॅच! जॉर्डन-रॉयने बाऊंड्री लाईनजवळ घेतला असा अफलातून झेल की सूर्यकुमार बघतच राहिला

‘सलामीवीर’ विराट! आत्तापर्यंत सलामीला फलंदाजी करताना अशी आहे कोहलीची कामगिरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---