भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा मैदानावर आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. तर मैदानाबाहेर तो हँडसम लूक आणि हटके स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. हेच मुख्य कारण आहे की, फक्त भारतातूनच नव्हे तर जगभरातून त्याला चाहते फॉलो करत असतात. दरम्यान, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठ-मोठे विक्रम आपल्या नावावर करणाऱ्या विराट कोहलीने सोशल मीडियावरही मोठा किर्तीमान केला आहे.
विराट कोहली सोशल मीडियावर बराच ॲक्टीव्ह असतो. सोशल मीडियावर त्याचे कोट्यवधी फॉलोवर्स आहेत. दरम्यान शुक्रवारी (३ सप्टेंबर) त्याचे इंस्टाग्राम या सोशल मीडिया नेटवर्किंग साइटवर १५० मिलियन फॉलोवर्स पूर्ण झाले आहेत. असा पराक्रम करणारा तो भारतातील नव्हे, तर आशियातील पहिला सेलिब्रिटी ठरला आहे.
इंस्टाग्राम या सोशल मीडिया नेटवर्किंग साइटवर सर्वाधिक फॉलोवर्स असलेला तो क्रिकेटपटू आहे. तसेच संपूर्ण क्रिडा विश्वातील तो चौथा खेळाडू आहे.
या यादीत सर्वोच्च स्थानी ख्रिस्तियानो रोनाल्डो आहे. रोनाल्डोचे एकूण ३३७ मिलियन फॉलोवर्स आहेत. तर दुसऱ्या स्थानी मेस्सी आहे. मेस्सीचे इंस्टाग्रामवर एकूण २६० मिलियन फॉलोवर्स आहेत. तर तिसऱ्या स्थानी १५० मिलियन फॉलोवर्स सह नेमार आहे. आता या यादीत भारतीय कर्णधार विराट कोहलीचा देखील समावेश झाला आहे. विशेष म्हणजे पहिल्या तिन्ही क्रमांकावर असलेले खेळाडू फुटबॉलपटू आहेत.
यापूर्वी विराट कोहली इंस्टाग्रामवर ७५ मिलियन फॉलोवर्स पूर्ण करणारा आशियातील एकमेव सेलिब्रिटी होता. इंस्टाग्रामसह फेसबुक आणि ट्विटरवर देखील विराट कोहलीचे कोट्यावधी फॉलोवर्स आहेत. त्याचे ट्विटरवर ४३.४ मिलियन आणि फेसबुकवर ४८ मिलियन पेक्षाही अधिक फॉलोवर्स आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
अवघ्या १४२ धावा करताना न्यूझीलंड संघाच्या नाकीनऊ, सलग दुसऱ्या सामन्यात बांगलादेशकडून पराभव
जार्वोच्या एन्ट्रीवर जाफरने ‘हे’ फनी मीम शेअर करत इंग्लंडच्या सुरक्षा यंत्रणेची उडवली खिल्ली
ऑली पोपने शार्दुलला दिला चांगलाच चोप, एकाच षटकात ठोकले सलग ४ चौकार, पाहा व्हिडिओ