---Advertisement---

वनडे मालिकेत रोहितसह ‘हा’ फलंदाज येणार सलामीला, कोहलीनेच केला खुलासा

On: सोमवार, मार्च 22, 2021 11:23 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंडची टी२० मालिका पार पडली असून आता उभय संघांमध्ये २३ मार्चपासून तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेपूर्वी बोलतांना भारतीय कर्णधार विराट कोहलीने मालिकेत भारताकडून सलामीवीराची भूमिका कोण पार पाडेल, याबाबत महत्वाचे वक्तव्य केले आहे. त्याने रोहित शर्मासह सलामीला उतरणाऱ्या फलंदाजाचे नाव सांगितले आहे.

सलामीच्या जागेबाबत संभ्रम 

नुकत्याच पार पडलेल्या टी२० मालिकेत भारतीय संघाने सलामीच्या जागेसाठी चार वेगवेगळे पर्याय आजमावून पाहिले. केएल राहुल, रोहित शर्मा, शिखर धवन, इशान किशन आणि खुद्द कर्णधार विराट कोहली अशा तब्बल पाच फलंदाजांनी सलामीला फलंदाजी केली. विशेष म्हणजे रोहित शर्मा आणि शिखर धवन या नियमित सलामीवीरांच्या जोडीला मात्र एकत्र एकाही सामन्यात संधी देण्यात आली नाही. त्यामुळे आता वनडे मालिकेत नक्की कोण सलामीला उतरणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला होता.

कोहलीने केला खुलासा   

मात्र आता कर्णधार कोहलीनेच हा संभ्रम दूर केला आहे. आगामी वनडे मालिकेत रोहित शर्मा आणि शिखर धवन हीच जोडी सलामीला उतरेल, असे त्याने स्पष्ट केले आहे. मालिकेपूर्वी झालेल्या आभासी पत्रकार परिषदेत तो बोलत होता.

यावेळी कोहली म्हणाला, “आगामी वनडे मालिकेत रोहित शर्मा आणि शिखर धवनच सलामीला फलंदाजी करतील. ज्यावेळी वनडे क्रिकेट खेळत असू, त्यावेळी यात काहीही बदल होणार. या दोघांच्या जोडीने गेली काही वर्षे सातत्याने आमच्यासाठी चांगले प्रदर्शन केले आहे. त्यामुळे यात बदल करण्याचे काही कारण नाही.”

टी२० सामन्यात कोहली स्वतः सलामीला फलंदाजी करणार का, याबाबत विचारले असता तो म्हणाला, “पाचव्या टी२० सामन्यात मी सलामीला येण्याचा घेतलेला निर्णय हा रणनितीअंतर्गत घेतलेला निर्णय होता. मात्र भविष्यात काय करणार, हे आम्ही त्यावेळी ठरवू. आत्ता तरी मी संघासाठी कुठल्याही स्थानी फलंदाजी करण्यासाठी तयार आहे. उर्वरित निर्णय आम्ही टी२० वर्ल्डकप नजीक आल्यावर घेऊ.”

महत्वाच्या बातम्या:

ब्रेकिंग! ज्युनियर नॅशनल कबड्डी स्पर्धेपूर्वी कोसळली प्रेक्षक गॅलरी 

धक्कादायक! पंचांनी ठोठावलेल्या निर्णयाने खेळाडूंमध्ये मारामारी; ठोसा लागून जमिनीवर पडला गोलंदाज

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात सामना व्हायला हवा होता

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---