इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या २२ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स हे बलाढ्य संघ आमने सामने होते. या सामन्यात बेंगलोर संघाने एका धावेने विजय मिळवला. या सामन्यात विजय मिळवत बेंगलोर संघ पुन्हा एकदा १० गुणांसह गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आला. तसेच सामना झाल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने मन जिंकणारे कृत्य केले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
बेंगलोर संघाने प्रथम फलंदाजी करताना १७१ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दिल्ली संघाकडून रिषभ पंत आणि शिमरॉन हेटमायर यांनी शेवटच्या चेंडूपर्यंत झुंज दिली होती. तरीदेखील त्यांना एका धावेने पराभवाचा सामना करावा लागला होता. हे पाहून पंत अतिशय निराश झाला होता. यावेळी कोहलीने त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत त्याची सांत्वना केली. यासोबतच त्याने पंतसोबत मैदानावर काही वेळसुद्धा घालवला. स
सोबतच हताश झालेल्या हेटमायरच्या डोक्यावर हात ठेवत त्याचेही कौतुक केले. तर मोहम्मद सिराजने देखील हेटमायरला मिठी मारत त्याची पाठ थोपटली. हा व्हिडिओ आयपीएल अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून कोहली किती दिलदार आहे, याचे उत्तर चाहत्यांना मिळाले आहे. तसेच या व्हिडिओवर चाहते अनेक प्रतिक्रीयाही देत आहेत.
What. A. Match!@RCBTweets prevail by 1 run. With 6 needed off the final ball, Pant hits a boundary but @DelhiCapitals fall short by a whisker. Siraj does well under pressure.
Hetmyer and Pant are distraught. https://t.co/NQ9SSSBbVT #DCvRCB #VIVOIPL pic.twitter.com/ju87soRG6B
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2021
You cannot miss this bonhomie 💙❤️#VIVOIPL 🤗 @DelhiCapitals 🤜🏽🤛🏽 @RCBTweets #DCvRCB pic.twitter.com/QjUYZAWBOM
— IndianPremierLeague (@IPL) April 27, 2021
Superb from Virat Kohli. He is putting his hand on Rishabh Pant's head. Very nice gesture from King Kohli. #IPL2021 pic.twitter.com/7kcbQDgnev
— Tanuj Singh (@ImTanujSingh) April 27, 2021
Virat kohli knows how it feels… pic.twitter.com/HVUvVbgW2s
— ` (@odd_err) April 27, 2021
— Maara (@QuickWristSpin) April 27, 2021
This was nice moment from Virat Kohli. pic.twitter.com/1XgtUXv6yY
— Johns. (@CricCrazyJohns) April 27, 2021
या सामन्यात दिल्ली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या बेंगलोर संघाकडून एबी डिविलियर्सने सर्वाधिक ७५ धावांची खेळी केली. तर रजत पाटीदारने ३१ धावा केल्या होत्या. यासोबतच ग्लेन मॅक्सवेलने २५ धावांचे योगदान दिले होते. बेंगलोर संघाला २० षटक अखेर १७१ धावांचा डोंगर उभारण्यात यश आले होते.
या धावांचा पाठलाग करताना रिषभ पंतने सर्वाधिक ५८ धावांची खेळी केली, तर शिमरन हेटमायरने ५३ धावांची तुफानी अर्धशतकी खेळी केली होती. शेवटच्या चेंडूवर जिंकण्यासाठी ६ धावांची आवश्यकता असताना रिषभ पंतने चौकार मारला आणि बेंगलोर संघाने हा सामना आपल्या नावावर केला.
महत्त्वाच्या बातम्या-
दिल्लीकर विराट नडतोय दिल्लीलाच! ‘ही’ आकडेवारी पाहून तुम्हीही असेच म्हणाल
आयपीएलमध्ये पाच हजारी मनसबदार बनला एबी, सोबतच ‘या’ यादीत झाला समाविष्ट
व्हिडिओ : आवेश खानने केली विराटची शिकार, कर्णधार झाला क्लीन बोल्ड