---Advertisement---

“एकट्या कोहलीवर बोट दाखवू नका, तेंडूलकर-पाँटिंगलाही आल्या होत्या अशा अडचणी”

On: शुक्रवार, ऑगस्ट 27, 2021 12:29 AM
---Advertisement---

सध्या इंग्लंड आणि भारत यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये भारतीय संघाने यजमान इंग्लंड संघावर चांगलेच वर्चस्व राखले आहे. पहिल्या कसोटी सामन्यातही भारतीय संघाने दमदार खेळ केली होती. मात्र, पावसामुळे तो सामना अनिर्णित राहिला. तर, दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडवर १५१ धावांनी विजय मिळवला आणि मालिकेत ०-१ ने आघाडी मिळवली.

असे असले तरी, भारतीय संघासाठी एक मोठी अडचण उभी राहिली आहे. ती म्हणजे कर्णधार विराट कोहलीचा खराब फॉर्म. कोहली गेल्या काही काळापासून खराब फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडच्या दौर्‍यात देखील कोहलीचा हा खरा फॉर्म तसाच कायम आहे. कोहलीचे आतापर्यंतच्या कसोटी सामन्यांमध्ये म्हणावे तसे प्रदर्शन झाले नाही. त्याने आतापर्यंतच्या ४ डावांमध्ये केवळ एकूण ६९ धावा केल्या आहेत. यामुळे भारतीय संघ आणि चाहते कोहलीच्या खराब फॉर्मबद्दल चिंतीत आहे.

अशात अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी कोहलीला त्याच्या खराब फॉर्म बाबत अनेक सल्ले दिले. यामध्ये काहींनी कोहलीची पाठराखण केली, तर काहींनी कोहलीच्या खराब फॉर्मवर टीकादेखील केली. नुकतेच भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी तर कोहलीला सचिन तेंडुलकरला फोन करून मदत मागण्याचा देखील सल्ला दिला आहेत.

यातच आता भारताचा माजी गोलंदाज झहीर खानने देखील विराट कोहलीच्या समर्थनात वक्तव्य केले आहे. या आधीही अनेक दिग्गज खेळाडूंना कधी ना कधी अशा अडचणींना सामोरे जावे लागले आहे. झहीर खानने सचिन तेंडुलकर आणि रिकी पॉंटिंग यांचे देखील उदाहरण दिले. जहीर खानच्या मते या दोन्ही महान खेळाडूंच्या कारकिर्दीत देखील असा काळ आला होता, जेव्हा ते त्यांच्या खराब फॉर्ममध्ये होते.

याबाबत क्रिकबजसोबत बोलताना झहीर खान म्हणाला, “कोहली एकटाच असा खेळाडू नाही, जो अशा अडचणींना सामोरे जात आहे. खूप काळापासून खेळणाऱ्या खेळाडूंच्या कारकिर्दीत असा काळ येतोच. जर तुम्ही रिकी पॉंटिंगलाच पाहिले, तर ज्यावेळी तो भारतात सामना खेळायला यायचा, तेव्हा त्याला फिरकीपटू गोलंदाजांसमोर अडचण यायची. त्यामुळे प्रत्येक फलंदाजाच्या कारकीर्दीत असा काळ येतोच. ज्यावेळी त्याला एखाद्या गोलंदाजांसमोर खेळताना अडचण निर्माण होते. सध्या कोहली अशाच काहीशा स्थितीत आहे. मात्र हा काळ देखील लवकरच निघून जाईल कोहली त्याच्या चुकांमधून नक्कीच शिकेल आणि एक चांगली खेळी करेल.”

दरम्यान, दुसऱ्या कसोटी सामन्यातील विजयानंतर मजबूत स्थितीत असलेल्या भारतीय संघाला तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने दमछाक करून सोडले. नाणेफेक जिंकत भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, इंग्लंडच्या गोलंदाजांनी या निर्णयाला सपशेल फेल ठरवले. भारतीय संघाची सुरुवातच अत्यंत खराब राहिली. ज्यामुळे भारतीय संघाचे सलामीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले आणि हा सिलसिला चालूच राहिला.

त्यानंतर भारतीय संघातील एकही खेळाडू भारतीय संघाचा डाव सावरण्यात यशस्वी झाला नाही. त्यामुळे इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीने भारतीय संघाला केवळ ७८ धावांवरच गुंडाळले.

महत्वाच्या बातम्या –
२०२१ मध्ये फक्त रूटचाच डंका! धावांच्या बाबतीत आसपासही नाही कोणता फलंदाज, पाहा आकडेवारी
म्हटलं होतं ना, सावध राहा! ‘होम ग्राउंड’वर शतक करत जो रूटने विक्रमांची घातली रास
एका वर्षात दोनदा केली रूटने अशी ‘लय भारी’ कामगिरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---