भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली हा आपल्या फलंदाजीसाठी आणि नेतृत्वासाठी नेहमीच चर्चेत असतो. मैदानावर फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण करत असताना चाहत्यांना विराट कोहलीचे आक्रमक रूप पाहायला मिळत असते. परंतु त्याहूनही उलट जेव्हा तो मैदानाबाहेर असतो त्यावेळी त्याचा खोडकर स्वभाव पाहायला मिळत असतो. त्याचे अनेक मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
विराट कोहली हा सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टीव्ह असतो. सर्वात जास्त फॉलो केला जाणारा हा स्टार खेळाडू मजेशीर व्हिडिओ आणि फोटो शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन करतो. असाच एक मजेशीर व्हिडिओ त्याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. ज्यामध्ये तो शिखर धवनच्या फलंदाजी स्टाईलची नक्कल करताना दिसून येतोय.
हा व्हिडिओ सर्वप्रथम विराट कोहलीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये विराट कोहली आपला संघ सहकारी शिखर धवनच्या फलंदाजी स्टाईलची नक्कल करतोय. हा व्हिडीओ सुरू होण्यापूर्वी तो म्हणतो की, “आज मी शिखर धवनच्या फलंदाजीची नक्कल करणार आहे. कारण तो स्वतःमध्येच हरवलेला असतो. हे पाहणे खूप मजेशीर असते.” यानंतर विराट कोहली बॅट धरून हुबेहूब डावखुऱ्या शिखर धवनची नक्कल करतो.
Shikhi, how's this one? 😉@SDhawan25 pic.twitter.com/nhq4q2CxSZ
— Virat Kohli (@imVkohli) October 18, 2021
हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करताच, प्रचंड व्हायरल झाला आहे. तसेच चाहते देखील या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. अनेकांनी विराट कोहलीचे कौतुक करत त्याला मल्टी टॅलेंटेड असे देखील म्हटले आहे. शिखर धवन बद्दल बोलायचं झालं तर, शिखर धवनला टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले नाहीये. शिखर धवन हा आयसीसीच्या स्पर्धांमध्ये भारतीय संघाचा सर्वात यशस्वी फलंदाज आहे. त्यामुळे त्याची निवड न झाल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते.