त्रिनिदादमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध भारत संघ दुसऱ्या कसोटी सामन्यात भिडताना दिसत आहेत. पहिल्या दिवशी खेळावर एकतर्फी वर्चस्व गाजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील भारतीय फलंदाजांनी पहिल्या सत्रात उत्कृष्ट कामगिरी केली. भारतीय संघाचा वरिष्ठ फलंदाज विराट कोहली याने आपले 29 वे कसोटी शतक पूर्ण करताना अनेक विक्रमांना गवसणी घातली. आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 500 वा सामना खेळत असलेल्या विराटने या खेळी दरम्यान अनेक विक्रम आपल्या नावे केले.
पहिल्या दिवशीच्या खेळानंतर विराट 87 धावांवर नाबाद होता. दुसऱ्या दिवशी खेळ सुरू झाल्यानंतर त्याने सावध सुरुवात केली. मात्र, संधी मिळाल्यानंतर त्याने चौकार वसूल करत 90 च्या पुढे मजल मारली. तर, शतकासाठी तीन धावांची आवश्यकता असताना त्याने चौकार ठोकत आपल्या कसोटी कारकिर्दीतील 29 वे शतक पूर्ण केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे त्याचे 76 वे शतक आहे. बाद होण्यापूर्वी त्याने 206 चेंडूवर 11 चौकारांच्या मदतीने 121 धावा केल्या.
विराटने या सामन्यात सतत पूर्ण करतात तो 500 व्या सामन्यात शतक झकावणारा क्रिकेट इतिहासातील पहिला फलंदाज ठरला. त्याच्या आधी 9 खेळाडूंनी 500 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहे. विशेष म्हणजे या खास सामन्यात इतर कोणतेही फलंदाज अर्धशतक ही पूर्ण करू शकले नव्हते. विराट या सामन्यात शतक झळकावल्यानंतर सर्वात वेगवान 76 शतके करणारा फलंदाज ठरला.
विराटने आपल्या 121 धावांच्या खेळी दरम्यान जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करण्याचा मान देखील मिळवला. त्याने रोहित शर्मा याला मागे टाकले. या व्यतिरिक्त 2023 या वर्षांमध्ये कसोटीत सर्वाधिक धावा काढणारा भारतीय फलंदाज देखील तो ठरला.
(Virat Kohli Creat More Records After 76 th International Century At Trinidad)
महत्वाच्या बातम्या –
BREAKING: त्रिनिदादमध्ये विराट पर्व! झळकावले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 76 वे शतक
बॅडलक! बेअरस्टोला शतकासाठी एक धाव हवी असताना गेली शेवटची विकेट, इंग्लंडची भलीमोठी आघाडी