---Advertisement---

आजा नचले! सामना सुरु असतानाच विराट कोहलीला आली नाचण्याची लहर, पाहा व्हिडिओ

---Advertisement---

साऊथॅम्टन। आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्याला शुक्रवारी आलेल्या पावसाच्या व्यत्ययानंतर अखेर शनिवारी(१९ जून) सुरुवात झाली. भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात द रोज बाऊल स्टेडियम, ऍजबॅस्टन येथे हा सामना होत आहे. या सामन्यादरम्यान भारताचा कर्णधार विराट कोहली रविवारी (२० जून) मस्तीच्या मूडमध्ये दिसून आला.

विराटने नाचण्यास केली सुरुवात 
या सामन्यात रविवारी भारताचा पहिला डाव २१७ धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर न्यूझीलंडकडून टॉम लॅथम आणि डेवॉन कॉनवे सलामीला फलंदाजीसाठी उतरले होते. यावेळी न्यूझीलंडच्या पहिल्या डावातील ९ वे षटक सुरु होते. याचवेळी स्टेडियममध्ये ढोल वाजण्याचा आवाज येण्यास सुरुवात झाली. हा आवाज ऐकून विराटचे पाय थिरकले आणि तो क्षेत्ररक्षण करता करताच काही वेळासाठी नाचू लागला.

यावेळी विराटच्या आजूबाजूला रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा आणि यष्टीरक्षक रिषभ पंत क्षेत्ररक्षण करत होते. विराटचा हा नाचण्याचा व्हिडिओ काहीवेळातच व्हायरल झाला.

विराटची असे सामन्यादरम्यान नाचण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही अनेकदा तो सामन्यादरम्यान अशी मस्ती करताना दिसून आला आहे.

https://twitter.com/DKtweetz_/status/1406621787497000960

दरम्यान, विराटने अंतिम सामन्यात क्षेत्ररक्षण करताना न्यूझीलंडच्या पहिल्या डावात आर अश्विनच्या गोलंदाजीवर टॉम लॅथमचा अफलातून झेल घेतला. त्यामुळे लॅथमला ३० धावांवर माघारी जावे लागले. तसेच न्यूझीलंडची ७० धावांची सलामी भागीदारीही तुटली.

चांगल्या सुरुवातीनंतर मोठी खेळी करण्यात विराटला अपयश
न्यूझीलंडविरुद्ध भारताकडून पहिल्या डावात विराटने चांगली सुरुवात केली होती. त्याने ८८ धावांवर भारताने ३ विकेट्स गमावलेल्या असताना अजिंक्य रहाणेबरोबर अर्धशतकी भागीदारी करत भारताचा डाव सावरला होता. मात्र चांगल्या सुरुवातीनंतरही त्याला त्याचे मोठ्या खेळीत रुपांतर करण्यात अपयश आले. तो १३२ चेंडूत एक चौकारासह ४४ धावांवर काईल जेमिसनच्या गोलंदाजीवर पायचीत झाला.

न्यूझीलंडचे पहिल्या डावात वर्चस्व
भारताचा पहिला डाव ९२.१ षटकात २१७ धावांवर संपुष्टात आला. भारताकडून उपकर्णधार अजिंक्य रहाणेने सर्वाधिक ४९ धावांची खेळी केली. तर विराटने ४४ धावा केल्या. त्याव्यतिरिक्त रोहित शर्मा ३४, शुबमन गिल २८ आणि आर अश्विनने २२ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून गोलंदाजीत काईल जेमिसनने शानदार कामगिरी केली. त्याने या सामन्यात ३१ धावांत सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त नील वॅग्नर आणि ट्रेंट बोल्टने प्रत्येकी २ आणि टीम साऊथीने १ विकेट घेतली.

त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या न्यूझीलंडने लॅथम आणि कॉनवेच्या दमदार सलामीमुळे तिसऱ्या दिवसाखेर ४९ षटकांत २ बाद १०१ धावा केल्या. तिसऱ्या दिवसाखेर कर्णधार केन विलियम्सन १२ धावांवर आणि रॉस टेलर शुन्यावर नाबाद आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

थोडीशी गंमत! तब्बल ६ फूच ८ इंच उंची असलेल्या काईल जेमिसनची भर सामन्यात चाहत्यांबरोबर मस्ती

डेवॉन कॉनवेची विकेट इशांत शर्मासाठी ‘विक्रमी’; कुंबळे, कपिल देव, झहीरच्या पंक्तीत मिळवले स्थान

कोहली-रहाणे जोडी नंबर एक! कसोटीमध्ये २०१३ पासून केलाय ‘हा’ पराक्रम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---