Thursday, March 23, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आरआरआर फिवर ऑन! चालू सामन्यात नाटू-नाटू गाण्यावर थिरकले विराटचे पाय

March 17, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter

Photo Courtesy: Twitter


भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला शुक्रवारपासून (दि. 17 मार्च) सुरुवात झाली. स्पर्धेतील पहिला सामना वानखेडे स्टेडिअमवर खेळवण्यात आला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला 188 धावांत रोखले. भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत असताना अनुभवी फलंदाज विराट कोहली हा चक्क मैदानावर नाटू-नाटू गाण्यावर ताल धरताना दिसून आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचे सर्वच फलंदाज संघर्ष करताना दिसलेले. वनडे मालिकेत चित्र काहीसे बदललेले असेल अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र, यावेळी ही परिस्थिती जैसे थे राहिली. भारतीय गोलंदाज पुढे मिचेल मार्श वगळता इतर फलंदाजांनी गुडघे टेकल्याने ऑस्ट्रेलियाचा डाव 188 धावांमध्ये संपुष्टात आला.

Virat Kohli dancing on "Natu, Natu" Song during the first innings today. pic.twitter.com/q6ly9JcvWk

— CricketMAN2 (@ImTanujSingh) March 17, 2023

 

सामन्याचे चित्र भारतीय संघाच्या बाजूने असताना मैदानावर सुरू असलेल्या संगीतामध्ये प्रसिद्ध असे नाटू-नाटू गाणे वाजवण्यात आले. त्यावेळी क्षेत्ररक्षण करत असलेला विराट कोहली हा देखील स्वतःला रोखू शकला नाही. त्याने या गाण्याची सिग्नेचर स्टेप करण्याचा प्रयत्न केला.

नाटू-नाटू हे गीत आरआरआर या दाक्षिणात्य चित्रपटातील आहे. नुकत्याच पार पडलेल्या 95 व्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये या गाण्याला सर्वात्कृष्ट गाण्याचा पुरस्कार मिळाला. त्यामुळे सध्या जगभरात हे गाणे मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत आहे.

(Virat Kohli Dance Step Of Oscar Winning Natu Natu Song In Mumbai ODI Against Australia)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“जिममुळे क्रिकेटपटूंच्या दुखापती वाढल्या”, भारतीय दिग्गजाने दाखवून दिली सत्य परिस्थिती
बॅटमधून फ्लॉप, पण यष्टीमागे सुपरस्टार! ऑस्ट्रेलियन कर्णधाराला बाद करण्यात राहुलचा सिंहाचा वाटा, पाहा Video


Next Post
Photo Courtesy: Twitter/BCCI

राहुल-जडेजाच्या चिवट खेळाने मुंबई वनडे टीम इंडियाच्या नावे! मालिकेचा विजयी प्रारंभ

वनडेत स्टार्कला अखेर विराटची विकेट मिळाली, दिग्गजांच्या यादीत वेगवान गोलंदाज सामील

Virat Kohli

विराटची 'चेस मास्टर' ओळख पुसली जातेय! वनडेत 20 चा आकडा गाठणे ही झालेय कठीण

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143