आयसीसी टी-20 विश्वचषक भारतीय संघासाठी एका भीतीदायक स्वप्नाप्रमाणे राहिला होता. बाद भेरीच्या आधीच भारताचे आव्हान संपुष्टात आले होते. विराट कोहली या स्पर्धेनंतर टी-20 संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार झाला. पुढच्या काही महिन्यांमध्ये भारतीय संघाचे कर्णधारपद माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनले होते. आता बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी विराटने कर्णधारपद सोडण्याबाबत खास प्रतिक्रिया दिली आहे.
विराट कोहली (Virat Kohli) याने टी-20 विश्वचषक 2021 स्पर्धा सुरू होण्याआधीच तो या प्रकारत पुढे कर्णधार म्हणून खेळणार नाही, असे सांगितले होते. विश्वचषकात भारतीय संघाच्या सुमार प्रदर्शनानंतर विराट आधी म्हटल्याप्रमाणे टी-20 कर्णधारपदावरून पायउतार झाला. पण यानंतर विराट आणि बीसीसीआय यांच्यातील संबंध तानले गेले. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी विराटला टी-20 विश्वचषकाचे कर्णधारपद न सोडण्याचा सल्ला दिला होता, अशा बातम्या समोर आल्या. पुढे विराटला वनडे संघाचे कर्णधारपद सोडावे लागले. गांगुलींमुळेच विराटला वनडे संघाचे कर्णधारपद सोडावे लागले, अशाही चर्चा मोठ्या प्रमाणात झाल्या.
असे असले तरी, आता सौरव गंगुली यांनी स्वतः विराटच्या कर्णधारपदाबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ‘दादागिरी अनलिमिटेड’च्या दहाव्या हंगामात सौरव गांगुली बोलत होते. विराटच्या कर्णधारपदाबाबत गांगुली म्हणाले, “मी विराट कोहलीला कर्णधारपदावरून कमी केले नाही. मी त्याला फक्त सांगितले होते की, जर त्याला टी-20 संघाचे नेतृत्व करायचे नसेल, तर संपूर्ण व्हाईट बॉल क्रिकेटचे कर्णधारपद सोड. हेय योग्य राहील.”
गांगुलींनी नुकत्याच दिलेल्या या मुलाखतीत स्वतःची बाजू स्पष्ट केली. पण विराट कोहलीने आधी सांगितल्याप्रमाणे रोहित शर्मा याला वनडे संघाचा कर्णधार बनवण्याआधी त्याच्यासोबत कोणत्याची बीसीसीआय अधिकाऱ्याने चर्चा केली नव्हती. ऐन वेळी विराटला वनडे संघाच्या कर्णधरपदावरून हडवल्याची माहीती मिळाली होती. पुढेने पुढे भारताच्या कसोटी संघाचेही कर्णधारपद सोडले.
विराटनंतर रोहितला टी-20, वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार म्हणून निवडले गेले. पण मागच्या दोन वर्षात रोहित कधीच या तिन्ही क्रिकेट प्रकारांमध्ये सातत्याने संघाचे नेतृत्व करताना दिसला नाही. जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या यांना अनेकदा संघाच्या नेतृत्वाची संधी मिळाली. भारतीय संघाला डिसेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिका दौरा करायचा आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी सूर्यकुमार यादव याला कर्णधार म्हणून संधी मिळाली आहे. तर वनडे मालिकेचे नेतृत्व केएल राहुल करताना दिसले. कसोटी मालिकेत मात्र रोहित शर्मा भारताचा कर्णधार असणार आहे. (Virat Kohli decided to quit the captaincy, Sourav Ganguly made a big revelation about it)
महत्वाच्या बातम्या –
मिचौंग चक्रिवादळादरम्यान लोकल बॉय अश्विनचा चेन्नई शहराला खास मेसेज, मराठमोठा रहाणे म्हणाला…
मिस्ट्री स्पिनर जोमात, फलंदाज कोमात! वरुण चक्रवर्तीने 9 धावा खर्चत घेतल्या 5 विकेट्स, नागालँड फक्त…