---Advertisement---

किंग कोहलीचा हटके अंदाज, ट्रेविस हेड बाद होताच केला मैदानावर भंगडा डान्स

On: मंगळवार, मार्च 4, 2025 5:19 PM
---Advertisement---

आज चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील उपांत्य फेरीचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघात दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्या दरम्यान वरूण चक्रवर्तीने पहिल्याच चेंडूत ट्रेविस हेडला बाद केले. या विकेट नंतर संपूर्ण स्टेडियम मध्ये चाहत्यांनी आनंद साजरा केला.

त्यादरम्यान विराट कोहली त्याचा आनंद लपवू शकला नाही. त्याने मैदानातच भंगडा डान्स केला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे.

मोहम्मद शमी कडून हेडचा कॅच सामन्याच्या पहिल्या चेंडूमध्ये सुटला होता. यानंतर हेडने सांभाळून फलंदाजी केली. त्यानंतर लयीमध्ये खेळत असलेला हेड चांगलीच फलंदाजी करत होता. कर्णधार रोहित शर्माने 9 वे षटक टाकण्यासाठी वरूण चक्रवर्तीला बोलावले. वरूणच्या पहिल्याच षटकातील चेंडूवर‌ ट्रेविस हेडने षटकार लावण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या चेंडूचा कॅच शुबमन गिलने घेतला. या विकेट नंतर स्टेडियममध्ये चांगलाच उत्साह निर्माण झाला होता.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया उपांत्यफेरी सामन्यापूर्वी वरूण चक्रवर्ती संबंधित हेड त्यांच्या असिस्टंट प्रशिक्षक डॅनियल विटोरी यांच्याशी बातचीत करत होता. की वरूण समोर कसे खेळायचे? पण त्याचा काही उपयोग झाला नाही वरूणने हेडला बाद केले.

ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार स्टीव स्मिथ याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीवीर फलंदाज कूपर कोनोलीला शून्य धावांवरच मोहम्मद शमीने बाद केले. तसेच शमी कडून पहिल्या चेंडूवरच हेडचा कॅच सुटला होता. त्याने 33 चेंडूत 39 धावांची पारी खेळली. त्यामध्ये त्याने दोन षटकार आणि 4 चौकार ठोकले.

हेही वाचा 

IND vs AUS: विराटने रचला इतिहास! राहुल द्रविडचा विक्रम मोडून पहिल्या स्थानी झेप

मोहम्मद रिजवानचा पत्ता कट, पाकिस्तानच्या कर्णधारपदी सलमान आगाची नियुक्ती

IND vs AUS; भारतीय खेळाडूंनी दंडावर काळी पट्टी का बांधली? कारण भावूक करणारं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---