रोहित शर्मा भारताचा कर्णधार झाला आहे तेव्हापासून संघ एका वेगळ्याच पद्धतीने फलंदाजी करत आहे. याचा प्रत्यय मागील टी20 सामन्यांमध्ये आलाच आहे. मुख्य प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्या मार्गदर्शनाखाली आता खेळाडू आपली विकेट गमावण्यात मागेपुढे पाहत नसून ते सुरूवातीलाच मोठे शॉट्स खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र याला विराट कोहली अपवाद आहे. त्याने अशा प्रकारचा खेळ करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात तो अपयशी झाला. तर विराट त्याच्या पद्धतीनेच खेळणार हे त्याने स्पष्ट केले आहे.
भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याचे आशिया चषकाच्या (Asia Cup) 15व्या हंगामात एक वेगळेच रूप पाहायला मिळाले आहे. त्याने सुरूवातीला खेळपट्टीवर टिकून राहण्यासाठी अधिक चेंडू खेळले आणि सेट झाल्यावर त्याने धावा काढण्याची गती वाढवली. अशी कामगिरी तो मागील काळापासून करत आला आहे. विराटची आधीची फलंदाजी पाहिली तर तो एकेरी, दुहेरी धावा घेण्यात (रनिंग बिटवीन विकेट्स) आणि चौकार मारण्यात उत्तम आहे.
अफगाणिस्तान विरुद्ध विजय मिळवल्यानंतर विराट आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यात विशेष मुलाखत झाली. बीसीसीआयने त्यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ ट्विटर अकाउंटवर शेयर केला आहे. या व्हिडिओमध्ये विराट म्हणाला की आता तो त्याच्या आधीच्या पद्धतीनेच फलंदाजी करणार आहे.
“माझे लक्ष्य नेहमीच क्रिकेटच्या तिन्ही प्रकारमध्ये खेळणे हेच आहे. मी प्रत्येक स्पर्धा आणि मालिकेत उतरण्यापूर्वी षटकार मारण्यात माझी ताकद नाही, मात्र वेळ आली तर षटकार मारू शकतो, असाच विचार केला. तसेच मी गॅपमध्ये चौकार मारण्यात पटाईत आहे. जर मी चौकार मारतो तेव्हाही संघाचा हेतू पूर्ण होत असेल तर चांगलेच आहे, असे विराट म्हणाला.
विराटने पुढेही त्याच्या या स्पर्धेतील फलंदाजीबाबत काय बदल झाला हे सांगितले आहे. तो म्हणाला, मी प्रशिक्षकासोबत माझ्या फलंदाजीबाबत बोललो असून त्यांना मी गॅप शोधण्याचा प्रयत्न करेल हे म्हटले. तसेच टी20 क्रिकेटमध्ये स्ट्राईक रेट वाढवायचा असेल तर षटकार मारावाच लागेल. हा विचार मी या स्पर्धेदरम्यान माझ्या डोक्यातून काढून टाकला आणि त्यामुळेच मला चांगली कामगिरी करण्यात मदत झाली.”
What happens when @ImRo45 interviews @imVkohli ☺️ 👏
Laughs, mutual admiration & a lot of respect 😎- by @ameyatilak
Full interview 📽️https://t.co/8bVUaa0pUw #TeamIndia | #AsiaCup2022 | #INDvAFG pic.twitter.com/GkdPr9crLh
— BCCI (@BCCI) September 9, 2022
महत्वाच्या बातम्या-