---Advertisement---

विराटवर कुबेराची कृपा! एका इंस्टाग्राम पोस्टसाठी मिळतात ‘इतके’ कोटी रुपये

On: गुरूवार, जुलै 1, 2021 10:30 PM
Virat-Kohli
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीचे चाहते केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात आहेत. इन्स्टाग्रामवर त्याच्या फॉलोवर्सची संख्या पाहून याचा अंदाज घेतला जाऊ शकतो. या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर १३ कोटींपेक्षा अधिक लोक विराटला फॉलो करतात. इंस्टाग्रामवरून कमाईच्या बाबतीत तो भारतीयांमध्ये पहिला आहे. शेड्यूलिंग टूल हॉपर एचक्यूच्या इन्स्टाग्राम रिचलिस्ट २०२१ च्या सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आली.

एका प्रायोजित पोस्टसाठी मिळतात इतके रूपये
विराटने इन्स्टाग्रामवर एक प्रायोजित पोस्ट केल्यास त्याला ५ कोटी रुपयांची कमाई होते. दोन वर्षांपूर्वी एका पोस्टसाठी त्याला १.३५ कोटी रुपये मिळायचे. म्हणजेच दोन वर्षांत एका इन्स्टाग्राम पोस्टसाठीची त्याची कमाई तीन पटीने वाढली आहे. इंस्टाग्रामवरून सर्वाधिक कमाई करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत पहिल्या वीसमध्ये असणारा विराट एकमेव भारतीय असून तो १९ व्या क्रमांकावर येतो.

रोनाल्डोचा कमाईच्या बाबतीत डंका
इंस्टाग्राम रिचलिस्ट २०२१ मध्ये पोर्तुगालचा स्टार स्ट्रायकर ख्रिस्टियानो रोनाल्डो पहिल्या स्थानावर आहे. एका प्रायोजित सोशल मीडिया पोस्टद्वारे तो तब्बल ११.९ कोटी रुपये कमावतो. रोनाल्डोने नुकतेच इंस्टाग्रामवर ३० कोटी फॉलोअर्स पूर्ण केले आहेत. इतके फॉलोअर्स मिळविणारा तो एकमेव व्यक्ती आहे. सर्वाधिक फॉलोअर्सच्या यादीत डब्ल्यूडब्ल्यूई स्टार ड्वेन जॉन्सन उर्फ द रॉक दुसर्‍या क्रमांकावर आहे. त्याचे २४ कोटीहून अधिक फॉलोअर्स आहेत.

सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत इन्स्टाग्रामवरून सर्वाधिक कमाई करणार्या खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर, विराट कोहली चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच्यापुढे रोनाल्डो, लिओनेल मेस्सी आणि ब्राझीलचा स्ट्रायकर नेमार आहेत. मेस्सी इन्स्टाग्रामवरील प्रायोजित पोस्टवरुन ८.६ कोटींची कमाई करतो. नेमारला एका पोस्टमधून ६.१ कोटी रुपये मिळतात. या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या पहिल्या १०० मध्ये असणाऱ्या भारतीय लोकांविषयी बोलायचे झाल्यास विराटव्यतिरिक्त बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा २७ व्या स्थानावर आहे. तिला एका पोस्टसाठी तीन कोटी रुपये मिळतात.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘पंतचा तो झेल सोडणे पडले असते महागात, त्यावेळी विचार आला की…’ टीम साऊदीने व्यक्त केल्या भावना

तब्बल २० वर्षांनंतर मेस्सीने सोडली बार्सिलोनाची साथ?

सॅम, टॉमनंतर तिसरा भाऊही वेधतोय सर्वांच लक्ष; स्टोक्सविरुद्ध सलग ४ चौकारांसह १९ चेंडूत ठोकलंय अर्धशतक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---