रविवारी (28 ऑगस्ट) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियवर चाहत्यांना एक रोमहर्षक सामना पाहायला मिळाला. मोठ्या विश्रांतीनंतर विराट कोहली पुन्हा एकदा चाहत्यांना खेळताना दिसला. भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेतील अभियानाची सुरुवात पाकिस्तानविरुद्ध केली. भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला, जो खेळाडूंनी अगदी योग्य ठरवला. विराटने या सामन्यात ३५ धावांची खेळी केली आणि स्वतःच्या नावापुढे मोठ्या विक्रमाची नोंद देखील केली.
मागच्या मोठ्या काळापासून खराब फॉरममध्ये असलेला विराट कोहली (Virat Kohli) या सामन्यात मोठी खेळी करेल, अशी चाहत्यांची अपेक्षा होती. पण त्यांना ३५ धावांवर समाधान मानावे लागले. विराटने या धावा 34 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने केल्या. या प्रदर्शनानंतर विराट आता भारतीय संघासाठी टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा ३० पेक्षा अधिक धावांची खेळी करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने एकूण ४५ वेळा ही कामगिरी केली आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट या बाबतीत संयुक्तरित्या पहिल्या क्रमांकावर आहेत.
भारतासाठी टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा ३०+ धावांची खेळी करणारे खेळाडू –
45 – विराट कोहली*
45 – रोहित शर्मा
28 – शिखर धवन
24 – केएल राहुल
24 – सुरेश रैना
दरम्यान, उभय संघातील या रोमांचक सामन्याचा विचार केला, तर भारताने ५ विकेट्स राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघ १९.५ षटकात १४७ धावा करून सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात भारताने हे लक्ष्य १९.४ षटकात गाठले. भारतासाठी भुवनेश्वर कुमार याने प्रथम गोलंदाजी करताना सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आधी गोलंदाजी आणि नंतर फलंदाजीत दोन्ही विभागांमध्ये चमकदार कामगिरी करणारा ठरला.
हार्दिकने ४ षटकांमध्ये २५ धावा खर्च करून ३ विकेट्स घेतल्या, तर फलंदाजी करताना १७ चेंडूत महत्वाच्या ३३ धावा ठोकल्या. शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी ७ धावांची आवश्यकता होती. हार्दिकने या षटकातील चौथ्या चेंडूवर एक जबरदस्त षटकार मारून भारताला विजय मिळवून दिला आणि यासाठी त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित देखील केले गेले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
बदला पूर्ण! हार्दिक-जड्डूच्या तडाख्यात पाकिस्तान उडाली; आशिया कपमध्ये टीम इंडियाचा विजयी श्रीगणेशा
अर्शदीप अन् भुवीच्या जोडीने भारताची स्थिती केली मजबूत! भारतीय वेगवान गोलंदाजांनी सामन्यावर राखलाय दबदबा
दुसऱ्याच चेंडूवर राहुलची शून्यावर दांडीगुल; भारताची खराब सुरुवात