राजकोट। आज(17 जानेवारी) भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात दुसरा वनडे सामना सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट येथे होणार आहे. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीला अनेक मोठे विश्वविक्रम करण्याची संधी आहे.
त्याने जर या सामन्यात एक शतक केले तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके करण्याच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज कर्णधार रिकी पाँटिंगला मागे टाकेल.
सध्या कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करण्याचा विश्वविक्रम पाँटिंग आणि विराटच्या नावावर संयुक्तरित्या आहे. विराटने 170 सामन्यात 41 शतके केली आहेत. तर पाँटिंगने 324 सामन्यात 41 शतके केली आहेत. त्यामुळे आता विराटला या यादीत पाँटिंगला मागे टाकण्याची संधी आहे.
एवढेच नाही तर विराटने जर या सामन्यात शतक केले तर तो वनडेमध्येही कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके करण्याच्या यादीत पाँटिंगची बरोबरी करेल.
सध्या वनडेत कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम पाँटिंगच्या नावावर आहे. पाँटिंगने 230 वनडेत कर्णधार म्हणून 22 शतके केली आहेत. पाँटिंगच्या पाठोपाठ या यादीत विराट आहे. विराटने कर्णधार म्हणून 84 वनडेत 21 शतके केली आहेत.
तेंडूलकरच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी –
विराटने जर या सामन्यात शतक केले तर हे त्याचे भारतात केलेले 20 वे वनडे शतक असेल. त्यामुळे तो भारतात सर्वाधिक वनडे शतके करण्याच्या सचिनच्या विक्रमाची बरोबरी करेल.
सचिनने वनडेमध्ये भारतात 164 सामने खेळताना 20 शतके केली आहेत. तर विराटच्या नावावर भारतात खेळताना 94 वनडे सामन्यात 19 शतके आहेत.
#आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणारे कर्णधार –
41 शतके – रिकी पाँटिंग (324 सामने)
41 शतके – विराट कोहली (170 सामने)
33 शतके – ग्रॅमी स्मिथ (286 सामने)
#वनडेत सर्वाधिक शतके करणारे कर्णधार –
22 शतके – रिकी पाँटिंग (230 सामने)
21 शतके – विराट कोहली (84 सामने)
13 शतके – एबी डिविलियर्स (103 सामने)
#भारतात सर्वाधिक वनडे शतके करणारे क्रिकेटपटू –
20 शतके – सचिन तेंडूलकर
19 शतके- विराट कोहली
10 शतके – रोहित शर्मा
१५ वर्षीय शेफाली वर्माचा बीसीसीआयच्या वार्षिक मानधन करारात समावेश, पहा संपूर्ण यादी
वाचा????https://t.co/hw9x8zUXJE????#म #मराठी #Cricket #TeamIndia #BCCI #Annualcontract #ShafaliVerma— Maha Sports (@Maha_Sports) January 17, 2020
आजपासून सुरु होणाऱ्या १९ वर्षांखालील विश्वचषकाबद्दल सर्वकाही…
वाचा????https://t.co/Sq5vD9CNyR????#म #मराठी #Cricket #TeamIndia #U19CWC— Maha Sports (@Maha_Sports) January 17, 2020