अहमदाबाद | पंधराव्या इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) हंगामाचा दुसरा क्वालिफायर सामना शुक्रवारी (२७ मे) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स या संघात झाला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात राजस्थानने बेंगलोरला ७ विकेट्सने पराभूत करत अंतिम सामन्यात दिमाखात प्रवेश केला, तर पुन्हा एकदा विराट कोहलीच्या एका फॅनमुळे सामन्यात व्यत्यय आला.
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने (Sanju Samson) नाणेफेक जिंकत बेंगलोरला प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान दिले. या सामन्याच्या पहिल्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूत विराटचा (Virat Kohli) एक चाहता सुरक्षाकवच तोडत (a pitch invader) मैदानात घुसला.
અમદાવાદ : વિરાટ કોહલીને મળવા ચાહક સુરક્ષા તોડી ગ્રાઉન્ડમાં ઘસી આવ્યો, જુઓ વિડિયો#CGNews #Ahmedabad #Viratkohli #Fan #Ground #NarendraModiStadium #TATAIPL #CGNews #Video pic.twitter.com/Syk4FXdhoM
— ConnectGujarat (@ConnectGujarat) May 27, 2022
यावेळी फलंदाजी करणाऱ्या विराटशी भेट झाल्यावर तो चाहता मैदानातच नाचू लागला. त्याला दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वेळेतच मैदानातून बाहेर काढले. या कारणामुळे सामना थोडा वेळ थांबवण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.
Just one ball and an intruder enters the Narendra Modi Stadium #ipl2022 #qualifier2 pic.twitter.com/jncREkSZG5
— Sidney Kiran (@Gunnersyd) May 27, 2022
या आयपीएल हंगामात कोहलीच्या चाहत्याने सामन्यात व्यत्यय आणण्याची ही काही पहिलीच घटना नाही. २५ मे रोजी झालेल्या लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यावेळीही अश्याच एका चाहत्याने क्षेत्ररक्षण करणाऱ्या कोहलीला भेटण्याचा प्रयत्न केला होता.
राजस्थान विरुद्धच्या सामन्यात विराटची बॅट शांतच होती. एक षटकार मारत आठ चेंडूत सात धावा करताच तो प्रसिद्ध कृष्णाच्या (Prasidh Krishna) गोलंदाजीवर सॅमसनला झेत देत बाद झाला.
हे आयपीएल विराट कोहलीसाठी अंत्यत निराशाजनक ठरले आहे. प्लेऑफमध्ये पोहोचण्याआधी त्याने गुजरात टायटन्स विरुद्ध ७३ धावा केल्या होत्या. यामुळे संघाच्या चाहत्यांना थोडासा दिलासा मिळाला होता. पण नंतर झालेल्या एलिमिनेटर आणि क्वालिफायर सामन्यात त्याच्या बॅटमधून धावा निघाल्या नाही.
या हंगामात विराटने १६ सामन्यांत २२.७३च्या सरासरीने ३४१ धावा केल्या. यात त्याने दोन अर्धशतके केली आहेत.
आयपीएल २०२२च्या १४ पैकी ८ साखळी सामने जिंकत बेंगलोर गुणतालिकेत चौथ्या स्थानावर राहिला होता. पण त्याआधी २१ मे रोजी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सला पाच विकेट्सने पराभूत केल्याने बेंगलोर प्लेऑफमध्ये पोहोचला होता.
एलिमिनेटर सामन्यात बेंगलोरने लखनऊला १४ धावांनी पराभूत करत क्वालिफायर सामन्यात प्रवेश केला. मात्र राजस्थानने त्याचे अंतिम सामन्यात पोहोचण्याचे स्वप्न धुळीस मिळवले.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
IPL Final । ‘उद्या रॉयल संघच जिंकेल फायनल’, राजस्थानच्या गोटातील दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी
बटलरने विलियम्सनला मागे टाकलेच, पण आता वॉर्नरचा ६ वर्ष जुना ‘हा’ विक्रमही धोक्यात
અમદાવાદ : વિરાટ કોહલીને મળવા ચાહક સુરક્ષા તોડી ગ્રાઉન્ડમાં ઘસી આવ્યો, જુઓ વિડિયો#CGNews #Ahmedabad #Viratkohli #Fan #Ground #NarendraModiStadium #TATAIPL #CGNews #Video pic.twitter.com/Syk4FXdhoM
— ConnectGujarat (@ConnectGujarat) May 27, 2022