बांग्लादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहलीचा खराब फॉर्म कायम आहे. चेन्नईतील पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावात कोहलीला विशेष काही करता आले नाही. पहिल्या डावात तो हसन महमूदच्या गोलंदाजीवर 6 धावांवर बाद झाला. दुसऱ्या डावात 17 धावांवर तो पंचांच्या चुकीच्या निर्णयाचा बळी ठरला. कोहलीने अंपायरच्या निर्णयाला आव्हान देण्यासाठी डीआरएसचा वापर केला नाही आणि तो एलबीडब्ल्यू आऊट झाला, नंतरच्या रिप्लेमध्ये असे दिसून आले की चेंडू त्याच्या बॅटला आधी लागला होता.
बांग्लादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीनंतर विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधील सरासरी 48.74 झाली आहे. जी गेल्या 8 वर्षांतील सर्वात कमी आहे. गेल्या वेळी 2016 मध्ये विराटची सरासरी 48.28 होती.
विराट कोहलीची 2020 पासून कसोटी क्रिकेटमधील कामगिरी घसरली आहे. गेल्या 30 सामन्यांमध्ये विराटने 32.72 च्या सरासरीने केवळ 1669 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 52 डावांमध्ये केवळ 2 शतके आणि 8 अर्धशतके झळकावली आहेत. तर जो रूटने या काळात बरीच शतके झळकावली आहेत. जर आपण सध्याच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलबद्दल बोललो तर त्याने 5 टेस्टच्या 8 डावात केवळ 392 धावा केल्या आहेत.
सलग तिसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी पात्र होण्यासाठी भारताला मायदेशात बांग्लादेश आणि न्यूझीलंडशी खेळावे लागेल आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळावी लागेल. अशा परिस्थितीत विराट कोहलीचे फॉर्ममध्ये परतणे भारतासाठी खूप महत्त्वाचे आहे.
हेही वाचा-
ind vs ban; अश्विनच्या फलंदाजीत एवढा बदल कसा? खुद्द खेळाडूनेच केला खुलासा
इरफान पठाणने शेवटच्या चेंडूवर सामना जिंकवला; अंबाती रायडू, रॉबिन उथप्पा फ्लॉप
5 दिग्गज खेळाडू ज्यांना संघातून कधीही वगळण्यात आले नाही