---Advertisement---

शुभमंगल सावधान! विराटचा ‘जिगरी दोस्त’ करतोय सोनाक्षी सिन्हाशी लग्न?

On: बुधवार, डिसेंबर 1, 2021 1:24 PM
---Advertisement---

भारत देशामध्ये क्रिकेट आणि बॉलिवुड या दोन गोष्टींचे भारतीय जनतेला सर्वाधिक आकर्षण आहे. अनेकदा या दोन्ही क्षेत्रातील लोक एकत्र आल्यानंतर लोकांची अफाट गर्दी पाहायला मिळते. तसेच, अनेक क्रिकेटपटूंनी बॉलिवूड अभिनेत्रींशी लग्नगाठ बांधून क्रिकेट-बॉलीवूड हे नाते आणखी घट्ट केले आहे. बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही लवकरच बंटी सजदेह याच्याशी लग्न करणार असल्याचे वृत्तसमोर आले आहे. बंटी हा पूर्णता क्रिकेट आणि बॉलीवूड क्षेत्रांमध्ये सक्रिय नसला तरी, त्याचे या दोन्ही क्षेत्रांशी अगदी जवळचे नाते आहे.

कोण आहे बंटी सजदेह?
सोनाक्षी सिन्हाचा नवरा म्हणून ज्याची चर्चा आहे तो बंटी सजदेह अभिनेता सोहेल खान याची पत्नी सीमाचा लहान भाऊ असल्याचे सांगितले जात आहे. याव्यतिरिक्त त्याने काही चित्रपटांसाठी निर्माता म्हणून देखील सहयोग केला आहे. याखेरीज त्याचे बॉलीवूडशी संबंध नाहीत.

बंटी बॉलीवूडशी मर्यादित स्वरूपात संलग्न असला तरी, भारतीय क्रिकेट क्षेत्राशी त्याचे जवळचे नाते आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याचा तो अगदी जवळचा मित्र मानला जातो. तसेच युवराज सिंग व अनेक भारतीय क्रिकेटपटूंशी त्याचे मित्रत्वाचे संबंध आहेत. बंटी हा कॉर्नर स्टोन या व्यवस्थापन क्षेत्राशी निगडीत कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. ही कंपनी प्रामुख्याने भारतीय व आंतरराष्ट्रीय खेळाडूंचे व्यवस्थापन पाहते. त्यामुळे बंटी आणि भारतीय क्रिकेटपटूंचा अनेकदा निकटचा संबंध येतो.

हे खेळाडू कॉर्नर स्टोनशी करारबद्ध
कॉर्नर स्टोन ही कंपनी भारतीय क्रीडा क्षेत्रातील अनेक मोठमोठ्या खेळाडूंचे काम पाहते. भारतीय क्रिकेटपटूंमध्ये विराटसह केएल राहुल, रवींद्र जडेजा तसेच महिला कुस्तीपटू विनेश फोगट, भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर व दिग्गज भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा हे प्रमुख खेळाडू कॉर्नर स्टोन कंपनीशी करारबद्ध आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

‘थँक्यू मोदी जी..’ इंग्लंडच्या दिग्गज क्रिकेटपटूने ‘या’ कारणाने मानले पंतप्रधानांचे आभार

शार्दुलबाबत बीसीसीआयने घेतला मोठा निर्णय!

आयपीएल संघांनी रिटेन केलेले ‘भारताचे भविष्य’; घ्या जाणून ‘त्या’ चौकडीविषयी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---