भारताचा दिग्गज खेळाडू ‘रविचंद्रन अश्विन’ने (Ravichandran Ashwin) बुधवारी (18 डिसेंबर) ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या मध्यावर निवृत्ती जाहीर केली. ‘बॉर्डर-गावसकर ट्रॉफी’च्या (Border Gavaskar Trophy) तिसऱ्या कसोटी सामन्यानंतर त्याने ब्रिस्बेनमध्ये निवृत्तीची घोषणा केली.
अश्विनने आपल्या कसोटी कारकिर्दीत 106 कसोटी सामन्यांमध्ये 24च्या सरासरीने 537 विकेट्स घेतल्या. यासह त्याने 3,507 धावा केल्या. अश्विनने एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात 156 आणि टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 72 विकेट्स घेतल्या आहेत.
घरच्या परिस्थितीत अश्विन हा अतिशय अप्रतिम गोलंदाज होता. विरोधी संघासाठी तो खूप धोकादायक ठरला आहे. त्याने भारतासाठी अनेक संस्मरणीय कामगिरी केली. ‘विराट कोहली’च्या (Virat Kohli) नेतृत्वाखाली अश्विनने भारताला अनेक सामने जिंकून दिले. निवृत्तीची जाहीर घोषणा करण्यापूर्वी अश्विन विराटशी भावूकपणे बोलताना दिसला. विराटनेही अश्विनला मिठी मारली. यानंतर त्याने सोशल मीडियावर अश्विनला त्याच्या आयुष्यातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या.
विराट कोहलीने सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर लिहिले- “मी 14 वर्षे तुझ्यासोबत खेळलो आणि जेव्हा तू मला आज सांगितले की तू निवृत्त होत आहेस तेव्हा मी थोडा भावूक झालो. इतकी वर्षे एकत्र खेळतानाचे चित्र डोळ्यासमोर आले. ॲश मी तुझ्यासोबत खेळण्याचा प्रत्येक क्षण एन्जॉय केला आहे. भारतीय संघाला सामना जिंकून देण्यात तुझे कौशल्य आणि तुझे योगदान कोणापेक्षा कमी नाही. भारतीय क्रिकेटचा एक महान खेळाडू म्हणून तू कायम स्मरणात राहशील. मी तुला तुमच्या कुटुंबासह तुझ्या आयुष्यासाठी आणि पुढे असलेल्या सर्व गोष्टींसाठी शुभेच्छा देतो. तुला आणि तुझ्या जवळच्या व्यक्तींना खूप प्रेम आणि आदर. माझ्या मित्रा, तू केलेल्या प्रत्येक गोष्टीबद्दल खूप खूप धन्यवाद.”
I’ve played with you for 14 years and when you told me today you’re retiring, it made me a bit emotional and the flashbacks of all those years playing together came to me. I’ve enjoyed every bit of the journey with you ash, your skill and match winning contributions to Indian… pic.twitter.com/QGQ2Z7pAgc
— Virat Kohli (@imVkohli) December 18, 2024
महत्त्वाच्या बातम्या-
रहाणे-पुजाराच्या निवृत्तीच्या प्रश्नावर रोहित शर्माची मजेशीर प्रतिक्रिया, म्हणाला…
अश्विनच्या निवृत्तीनंतर अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी दिली प्रतिक्रिया! म्हणाले…
3 खेळाडू जे भारतीय कसोटी संघात आर अश्विनची जागा घेऊ शकतात