भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना भारताने जिंकला. हा सामना मोहालीमध्ये खेळला गेला. दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीसाठी हा त्याच्या कारकिर्दीतील १०० वा कसोटी सामना होता. या खास सामन्यानंतर विराटने त्याच्या एका दिव्यांग चाहत्याला स्वतःची जर्सी भेट दिली आहे.
विराटच्या या चाहत्याचे नाव आहे धर्मवीर पाल. विराटने स्वतःच्या १०० व्या कसोटी सामन्यात घातलेली जर्सी धर्मवीरला भेट दिल्यानंतर तो खूपच खुश झाला. या प्रसंगाचा व्हिडिओ त्याने स्वतःच्या ट्वीटर खात्यावरून शेअर केला आहे, तसेच विराटचे आभारही मानले आहे. धर्मवीरला भारतीय संघाचा अनधिकृत १२ वा खेळाडू म्हटले जाते. तो भारतीय संघाचे सामने पाहण्यासाठी नेहमी मैदानात हजर असतो आणि त्यामुळे चाहत्यांमध्येही त्याची ओळख निर्माण झाली आहे.
भारतीय संघाचा सामना ज्या मैदानावर असेल, त्याठिकाणी धर्मवीर पोहोचतो. मोहलीमध्येही तो मैदानात उपस्थित होता आणि सामना संपल्यानंतर विराटकडून त्याला ही भेट मिळाली आहे. विराटकडून जर्सी भेट मिळतानाच व्हिडिओ धर्मवीरने शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, “हा माझ्या आयुष्यातील खास दिवस आहे, हा त्याचा (विराट) १०० वा कसोटी सामना होता आणि त्याने मला भेट म्हणून जर्सी दिली. खूप भारी.”
https://twitter.com/dharmveerpal/status/1500512923755552770?s=20&t=S42u50kgGqTer2Dsg2-7mg
दरम्यान, उभय संघातील या पहिल्या कसोटी सामन्याचा विचार केला, तर भारताने यामध्ये मोठा विजय मिळवला. कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ८ विकेट्सच्या नुकसनावर ५७४ धावा केल्या. त्यानंतर श्रीलंका संघ त्यांच्या पहिल्या डावात १७४ धावांवर सर्वबाद झाला. त्यानंतर भारताने त्यांना फॉलो ऑन देण्याचा निर्णय घेतला. परंतु दुसऱ्या डावातही श्रीलंकन खेळाडूंनी निराशाजनक प्रदर्शन केले आणि १७८ धावावर सर्व विकेट्स गमावल्या. परिणामी भारताने सामना एक डाव आणि २२२ धावांनी जिंकला.
महत्वाच्या बातम्या –
फलंदाजीत तर तुलना होतेच, पण आता पाकिस्तानच्या आझमची गोलंदाजीतही विराटची कॉपी, पाहा व्हिडिओ
आवडत्या मैदानात दिवंगत फिरकीपटू शेन वॉर्नवर होणार अंतिम संस्कार! १ लाख लोक लावतील उपस्थिती
दिल ये जिद्दी है! आयपीएलमध्ये सहभागी होण्यासाठी चेन्नईच्या दीपक चाहरचा कसून सराव, व्हिडिओ व्हायरल






