भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) 2 सामन्यांची कसोटी मालिका मंगळवारी (1 ऑक्टोबर) कानपूरच्या मैदानावर संपली. चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 280 धावांनी विजय मिळवला, तर दुसऱ्या कानपूर कसोटीत भारताने 7 गडी राखून बांगलादेशचा धुव्वा उडवला. यासह भारताने 2-0 ने मालिका आपल्या खिशात घातली. कानपूर कसोटीच्या विजयानंतर भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीने (Virat Kohli) बांगलादेशच्या स्टार खेळाडूला आपली बॅट गिफ्ट केली.
PICTURE OF THE DAY. ❤️
– Virat Kohli gifting his bat to Shakib Al Hasan. [📸: BDCricTime] pic.twitter.com/ozzNmZ2AfF
— Johns. (@CricCrazyJohns) October 1, 2024
या सामन्यानंतर विराट कोहलीने (Virat Kohli) आपला आदर दाखवत बांगलादेशचा महान अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनला (Shakib Al Hasan) आपली बॅट भेट दिली, त्यावर त्याने त्याची सही केली. शाकिबने आपल्या कारकिर्दीत 14,000 हून अधिक धावा आणि 700 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
कानपूर कसोटी सुरू होण्यापूर्वी शकीब अल हसनने (Shakib Al Hasan) सांगितले होते की, “मी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत खेळण्यास उत्सुक आहे. पण दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची निवड झाली नाही, तर भारताविरुद्ध खेळला जाणारा दुसरा कसोटी सामना हा शेवटचा सामना असेल. कारण आजकाल बांगलादेशमध्ये बरेच काही घडत आहे, त्यामुळे या क्षणी काही गोष्टी माझ्या हातात नाहीत.”
महत्त्वाच्या बातम्या-
“राहुल द्रविड आणि गौतम गंभीर…” बांगलादेशला पछाडल्यानंतर कर्णधाराचे मोठे वक्तव्य!
IND vs BAN: यशस्वीने 11व्या कसोटीतच केली सेहवागची बरोबरी, यादीत अन्य भारतीय नाही
IND vs BAN: टीम इंडियाने बांग्लादेशला हरवून मायदेशात साकारला सलग 18वा कसोटी मालिका विजय